जिल्हा ग्रंथालय अधिकारी कोरे साहेब यांची राजमाता जिजाऊ

31

🔸महिला नागरी सहकारी पत संस्थेस सदिच्छा भेट..!!
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.1फेब्रुवारी):- येथील राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूरला जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिल्ली यावेळी व्यवस्थापक प्रशांत वानखेडे यांनी त्यांचे पुस्प गूच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.या वेळी मतदार चे प्रतिनिधी अनिल चेंडकाळे सर हेउपस्थित होते.

तसेच पतसंस्थेचे मुख्य मार्गदर्शक व आधार स्तंभ प्रा.महादेव सखाराम गावंडे हे सुद्धा उपस्थित होते.कोरे साहेबांनी यांनी अतिशय अल्प कालावधीत पतसंस्था ही प्रगतीपथावर आणी प्रगतीकडे वाटचाल करीत असुन वअशीच प्रगती होत राहो.असे सदिच्छा भेटीच्या वेळी सांगितले.

या वेळी पतसंस्थेचे कर्मचारी रोखपाल मीनल दुधाने लिपिक
आशा ठाकरे,वसुली अधिकारीसुयोग राऊत,अल्प बच्चत प्रतिनिधी निलेश बोरकर, सेवक कविता पोले,ओंकार जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.कोरे साहेबांनी सदिच्छा भेट दिल्या बदल प्रा. महादेव गावंडे यांनी साहेबाचे आभार मानले.