


🔸तहसीलदाराला महिलांनी दिले निवेदन
✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 4 फेब्रुवारी):-मौजे चिंचोली संगम येथील शेत सर्वे नंबर 67 / 4 अ शेताचे उत्तर भागाकडून असलेला पांदण रस्ता खुला करून देण्यासाठी तहसीलदार उमरखेड यांना दि. 2 फेब्रुवारी रोजी महिला शेतकऱ्यांनी दिले निवेदन.
येथील सौ. जयश्री गणेश ठमके व सौ ज्योती संतोष ठमके या महिलांच्या नावाने मौजे चिंचोली संगम येते सर्वे नंबर 67 / 4 व सर्वे नंबर 66 /1 यामधील क्षेत्रफळ 1.02 हेक्टर आर शेतजमीन असून सदर शेत जमिनीचे उत्तर भागाकडून पांदण रस्ता आहे.
परंतु सदर पांदण रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पांदण रस्त्याचे आपल्या शेतामध्ये वही ती करिता उपयोगात घेतले असताना सदरील पांदण रस्त्यावरून शेतमाल ने आण करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे येथील संतप्त महिलांनी तहसीलदार उमरखेड यांना निवेदनातून उत्तरे कडील भागाकडून गाव नकाशा मध्ये दर्शविण्यात आलेला पांदन रस्ता खुला करून देण्याची विनंती केली आहे.




