विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्नं बघून त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर परिश्रम करावेत : डॉ. प्रदिप सुर्यवंशी

29

🔹पी. आर. हायस्कूलचा १०९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : परानंदात विद्यार्थी रंगले.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.5फेब्रुवारी):-विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्नं बघा, त्यासाठी खडतर परिश्रम करा. नेहमी सकारात्मक विचार करा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन भारती विद्यापीठ पुणे, येथील नवजात शिशू विभाग प्रमुख तथा पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांनी केले . ते पी. आर. हायस्कूलच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते.

पी. आर. हायस्कूलच्या १०९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि परानंद सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. त्यांनी संस्थेची गौरवशाली वाटचाल आपल्या मनोगतातून मांडली. त्या नंतर इंग्रजी शिक्षक जी आर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांसह घेतलेले उपक्रम English Essay Writing Competition यांचें हस्तलिखित प्रकल्पाचे विमोचन डॉ सूर्यवंशी ,डॉ कुळकर्णी डॉ डहाळे सचिन अत्तरदे व मान्यवरांचा शुभहस्ते करण्यात आले डॉ. सुर्यवंशी यांनी आपल्या यशाचे श्रेय पी. आर. हायस्कूल आणि तेथील गुणवंत शिक्षकवृंदांना दिले. आपण कठीण परिस्थितीत खडतर मेहनत केली.

गुणवत्तेचा ध्यास धरला. सातत्य ठेवले म्हणूनच यशाचे शिखर गाठू शकलो असे ते म्हणाले. जगात फक्त ४० नवजात शिशू तज्ञ असून त्यातील अशिया खंडातील ते एकमेव तज्ञ आहेत. संस्थेने व शिक्षकांनी काळानुसार तंत्रज्ञान आणि इंग्रजी माध्यमाचा स्विकार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधिही विसरु नये व सतत त्यांच्या संपर्कात रहावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षक हे शाळेची संपत्ती असतात. त्यासाठी संस्थाचालकांनी शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी करावी अशी सूचना त्यांनी मांडली.

परानंद सांस्कृतिक कार्यक्रमाचं मनसोक्त आनंद विद्यार्थी पालक व रसिकांनी घेतला.या प्रसंगी तहसीलदार नितिनकुमार देवरे, बीडीओ सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, माजी विद्यार्थी सचिन अत्तरदे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सौ. निनाताई पाटील, राजेशशेठ भाटीया, माजी मुख्याध्यापक एस. ई. मिसर, प्रा.बी.एन.चौधरी, माजी उपमुख्याध्यापक बी. पी. पाटील, संगीत शिक्षक सी. ए. शिरसाठ, ॲड. सुतारे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. निकम, उपमुख्याध्यापिका सौ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक के. आर. वाघ आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जी. आर. सुर्यवंशी, यु. एस. बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन आर. जे. धनगर व आर. एम. ठाकरे यांनी केले.