गंगाखेड मतदारसंघातील ‘त्या’ रस्त्यांची होणार ‘समृध्दी

30

🔹आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंचा पाठपुरावा : २३.५० कोटींच्या कामांना मंजुरी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5फेब्रुवारी):-विधानसभा मतदार संघातील रस्ते व पुल दुरुस्ती तसेच रुंदीकरण कामासाठी कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन तब्बल २३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे विधानसभा मतदार संघातील ‘त्या’ रस्त्यांची लवकरच ‘समृध्दी’ होणार असल्याने नागरिक आनंदी झाले आहेत.

याविषयी सविस्तर असे की, गंगाखेड विधानसभेच्या कार्यक्षेत्रात अनेक समस्या व अडचणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे पायाभुत व नागरी प्रश्न मार्गी लावताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे रस्त्यांकडे विशेष लक्ष आहे. म्हणून ते राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन जास्तीत-जास्त निधी आणीत आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातले रस्ते दुरुस्ती व रुंदीकरण कामांना गती प्राप्त झाली आहे. त्याचा फायदा गावातंर्गत रस्ते तसेच जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांना होत आहे.

त्यानुसार विशेष रस्ते दुरुस्ती योजने अंतर्गत राज्य महामार्ग २३४ वरील गंगाखेड-अकोली ते कोद्री-अंतरवेली पर्यत रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण व घाट सुधारणा करणे यासाठी १३ कोटी आणि नाबार्ड योजने अंतर्गत पालम ते पुयनी रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, मरडसगाव ते रावराजूर रस्त्यावरील छोट्या पुलाचे बांधकाम करणे, मिरखेल रेल्वे स्टेशन ते कान्हेगाव पुढे फुकटगाव रस्त्यावरील छोट्या पुलाचे बांधकाम करणे यासाठी १० कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे मतदार संघातील रस्त्यांना बळकटी मिळणार असून नागरिकांचे दळणवळण सुखकर व गतिमान होणार असल्याची चर्चा होत आहे.

जनतेचा आशीर्वाद हेचं भांडवल – आ.डॉ.गुट्टे
राजकीय आरोपांच्या संकटात माझ्या पाठीशी उभे राहिलेले माझे सर्वसामान्य मतदार नेहमी मला पाठबळ देतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे माझे कर्तव्य आहे. करण, ते माझ्या कुटुंबाचे भाग आहेत. त्यामुळे प्रश्न व‌ अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असतो. त्यांच्या आशीर्वादाने संकटाशी दोन हात करण्याचे बळ मिळते. म्हणून जनतेचा आशीर्वाद हेचं भांडवल आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आ.डॉ.गुट्टे यांनी दिली.