झाडे कुणबी समाजाचा प्रबोधनात्मक स्नेहमिलन सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

29

✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागभीड(दि.6फेब्रुवारी):- येथे झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने झाडे कुणबी समाजाचा प्रबोधनात्मक स्नेहमिलन सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार प्रायमरी टिचर्स सोसायटी सभागृह नागभीड येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर या कार्यक्रमाच्या उद्घाटीका मा. प्रा. डाॅ. सौ. रजनीताई जगदीश राखडे, अधिव्याख्याता ताराचंदजी निखाडे अध्यापक महाविद्यालय साकोली, प्रमुख मार्गदर्शक श्री. जितेंद्रदादा आसोले युवा प्रबोधनकार कवि व व्याख्याते गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. यशवंतराव भेंडारकर उपसरपंच कोटगाव, प्रमुख अतिथी श्री. केशवराव भेंडारकर, अध्यक्ष झाडे कुणबी समाज संघटना चंद्रपूर,श्री. टोपलालजी हेमने, अध्यक्ष भंडारा जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा, श्री. नरेंद्रभाऊ शेंडे, सचिव भंडारा जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा, श्री. सचिन कठाणे अध्यक्ष झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड, हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी सन – 2022 मध्ये दिवंगत झालेल्या समाजातील समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका मा. प्रा. डाॅ. सौ. रजनीताई जगदीश राखडे, शिक्षण, समाज संघटन, शेती, अंधश्रद्धा, ओबीसी समाज, बचत गट,स्त्रियांचे आरोग्य व शिक्षण, युवक रोजगार, विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. जितेंद्रदादा आसोले, युवा प्रबोधनकार कवि व व्याख्याते गोंदिया यांनी समाज बांधवांना प्रभावी असे समाजप्रबोधन केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका मा. प्रा. डाॅ. सौ. रजनीताई राखडे यांनी नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त केल्या बद्दल समाज संघटनेकडून व मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. तसेच झाडे कुणबी समाजातील वर्ग 10, 12 वी ईतर वेगवेगळ्या परिक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या 52 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक , सहकार, व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या सुध्दा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड चे अध्यक्ष श्री. सचिन कठाणे यांनी केले.त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुरुदास शिवणकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सौरभ शिवशंकर कोरे, सदस्य झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमास नागभीड तालुक्यातील झाडे कुणबी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.