पुसद येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

102

🔹समता सैनिक दलाची मानवंदना

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9फेब्रुवारी):- येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२५ जयंती ही प्रज्ञापर्व समिती २०२२ च्या वतीने साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तथागत भगवान बुद्धांना पुष्प अर्पण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद संरक्षण विभाग समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

यावेळी प्रज्ञापर्व समिती २०२२चे अध्यक्ष विठ्ठल खडसे , कार्याध्यक्ष अशोक भालेराव, उपाध्यक्ष राजेश ढोले, सचिव दिपक भवरे, संघटक संतोष अंभोरे,प्रा.कल्याण साखरकर,मंडळ कृषी अधिकारी अरविंद दिवे,साहेबराव गुजर,सुरज कुरील, माजी सैनिक भारत कांबळे तसेच इत्यादी समता सैनिक दलाचे सैनिक ,आदी मान्यवर तथा समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.