वसंत कारखाण्याच्या कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू

29

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 9 फेब्रुवारी):- वसंत कामगार युनियनच्या कामगारांनी पुकारलेल्या बेमुत उपोषणाच्या संदर्भात वसंतचे युनियनचे प्रतिनिधी, भैरवनाथ शुगर वर्क्स व अवसायक यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती पण ह्या बैठकीत कोणताही निर्णय कामगाराच्या कामावर घेण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

म्हणून दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी दु.12 वाजेपासुन अवसायकाचे कार्यालायासमोर (गेटवर) बेमुदत उपोषणाला बसण्याची पाळी कामगारावर आली.

वसंत कारखाण्याचा गळीत हंगाम दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सुरू झाला. तरीही अवसायक यांनी कार्यरत कामगारांना कामावर घेण्यासाठी कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती त्यामुळे बेरोजगार असलेल्या व उपासमारी जीवन जगत असलेल्या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही त्यामुळे कामगाराच्या हक्कास बाधा येत कामगार कायद्याचे व झालेल्या कराराचे अवसायकांनी सततपणे उलंगण केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष दिलेल्या निवेदनात करण्यात आला होता.

वसंत साखर कामगार युनियनचे अध्यक्ष पि.के मुडे व सचिव व्ही.एम. पतगराव यांच्या नेतृत्वात प्रमोद कांबळे, भानुदास चव्हाण, कैलास चव्हाण, शिवाजी बाबुराव वाकडे, चंद्रशेखर धुमाळे, आत्माराम दोडके, संतोष शिंन्दे, गजानन देमगुंडे,कैलास मांगुळकर, प्रकाश ढगे, विकास बरडे,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,संजय ढोले, रफिक पटेल,आयुब पटेल, रवि कोढुरकर हे सोळा कामगार बेमुदत उपोषणाला बसले.

यावेळी वसंत कामगार युनियनचे अध्यक्ष पि.के.मुडे, व्ही. एम. पतंगराव, विनोद शिन्दे, नागेश खंंदारे, बाबुराव बरडे, जालीधर वाघमारे, संजय चव्हाण, संजय शिन्दे, विनायक लाडगे,शिवाजी जेठेवाड, बाबुलाल राठोड गजानन मागुळकर,चद्रभान ढाकरे असे अनेक कामगार यावेळी उपस्थित होते.