जागरूक पालक , सुदृढ बालक अभियानाची सुरुवात

29

🔸संजय गजपुरे यांच्या हस्ते तालुकास्तरीय अभियानाचे उद्घाटन

✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागभीड(दि.10फेब्रुवारी):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने संपूर्ण राज्यात आजपासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियानची सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर अभियानामध्ये ० ते १८ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत सर्व शाळा तथा अंगणवाडी केंद्रात केली जाणार आहे. या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ नागभीड येथे पार पडला.

नागभिड तालुक्यात कर्मवीर विद्यालय नागभिड येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते उद्घाटनिय सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य देविदास चिलबुले सर यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी विद्यार्थ्यांना अभियानाची रूपरेषा तथा आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

संजय गजपूरे यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व विषद करून नेहमी निरोगी कसं राहता येईल याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक ईडपाचे सर यांनी केले.सदर उद्घाटनिय कार्यक्रमात प्रा.आ.केंद्र नवेगाव पांडव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता पत्रे तथा प्रा.आ.केंद्राचे कर्मचारी वृंद, शालेय आरोग्य तपासणी पथकाचे डॉ. दिलीप फटिग, डॉ. सीमा खरकाटे तसेच त्यांची चमू , आशा सेविका आणि कर्मवीर विद्यालयाचे शिक्षक तथा कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.