ज्येष्ठ कवी सोपानराव शिंदे लिखित बारा पुस्तकांचे प्रकाशन रविवारी मायणीत एकाच वेळी

33

✒️सांगली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सांगली(दि.11फेब्रुवारी):- मानवी जीवनावर सखोल भाष्य करणाऱ्या, नव्या पिढीसाठी वैचारिक ठेवा निर्माण करणाऱ्या, प्रत्यक्ष जीवनानुभावाला स्पर्श करणाऱ्या ज्येष्ठ कवी व लेखक सोपानराव शिंदे यांच्या आयुष्याच्या वाटेवर, स्वाभिमान, भरारी, सावली, युगानु युगे, जगणं आणि वागणं, अनमोल जीवन, दर्शन, आयुष्य, जीवन, किंकाळी, झुटींग या बारा पुस्तकांचा प्रकाशन समारंभ एकाच वेळी साई मंगल कार्यालय, मोराळे रोड, मायणी, ता. खटाव, जि. सातारा या ठिकाणी रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता होणार असून यावेळी त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात येणार आहे.

सदर प्रकाशन समारंभास गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. श्रीकृष्ण अडसूळ, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित देशमुख, कोल्हापूरचे कवी, लेखक व निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल म्हमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ कवयित्री रंजना सानप, कवी किरण भिंगारदेवे, शुभम शिंदे, महादेव शिंदे यांनी केले असून सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद प्रकाशन, कोल्हापूरच्या प्रकाशिका प्रा. डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.