युवा नेतृत्व आणि समुदाय विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न

29

🔸युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहरू युवा केंद्र सदैव तत्पर — अमित पुंडे

🔹संधीची वाट न बघता स्वतः संधी तयार करा व मिळेल त्या संधीचा सोना करा – अनुप कोहळे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11फेब्रुवारी):-युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या वतीने सहा ते आठ फरवरी 2023 दरम्यान, तीन दिवसीय युवा नेतृत्व आणि समुदाय विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा समारोप 8 फरवरी रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोलीच्या प्रांगणात पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे मुख्य मार्गदर्शक म्हणून शिवकल्याण संस्था अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे, तनिष्क ग्रामीण विकास संस्था वर्धा चे संचालक गजानन ढोबळे उपस्थित होते.

भारत हा युवकांचा देश आहे मात्र देशातील युवकांसमोर सध्या स्थितीत मोठे आव्हान असून ते आवाहन पेलण्याकरिता युवकांनी फक्त पुढून येणाऱ्या संधीची वाट न बघता स्वतःच संधी तयार करून किंवा मिळेल त्या संधीचे सोना करण्याकरिता प्रयत्न करावे असे प्रतिपादन शिवकल्याण संस्था अध्यक्ष तथा जिल्हा युवा युवक पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांनी केले . यावेळी अनुप कोहळे यांनी सामाजिक कार्यातून घडत गेलेल्या त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि त्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र कडून मिळालेल्या राज्यस्तरीय युवा संसद आणि राष्ट्रीय युवा महोत्सव मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि जिल्हा युवा पुरस्कार पर्यंतचा प्रवास या विषयावर सुद्धा मनोगत व्यक्त केले सोबतच आपण करत असलेल्या कार्यात इतरही युवकांनी सामोर येऊन सहकार्य करावे व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच जिल्ह्याच्या विकासात सुद्धा हातभार लावावा त्याकरिता पुढे येऊन सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.

युवकांना एकत्रित करून त्यांच्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व विकासाला वाव देण्याकरिता नेहरू युवा केंद्र संघटन हे प्रभावी माध्यम आहे, युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहरू युवा केंद्र सदैव तत्पर असून युवकांना सहकार्य करेल असा विश्वास जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी शिबिरार्थी युवकांना दिले.

तीन दिवस चाललेल्या या युवा नेतृत्व आणि समुदाय विकास कार्यक्रमात जिल्हाभरातून 40 युवा युवकांनी सहभाग नोंदविला असून तीन दिवसीय निवासी शिबिरात सामाजिक कार्यकर्ते
अमृत बंग, चेतना लाटकर, नरेंद्र आरेकर, डॉ. दिलीप बारसागडे, डॉ. गभाने, डॉ. वडपल्लीवार यांनी आणि इतर तज्ञांकडून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विलास निबोरकर, उपेंद्र रोहनकर, विठ्ठलराव कोठारे यांनी युवकांच्या मनातील अंधश्रद्धा व त्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्याचे काम केले. सोबतच विविध विभागाकडून चालणाऱ्या शासकीय योजनांची माहिती सहभागीना देण्यात आली. समारोपदरम्यान स्कूल बॅग आणि इतर भेटवस्तू युवकांना देण्यात आल्या.