महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी शरणागत यांची निवड

36

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.15फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्या मध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या विविध प्रकारच्या पत्रकार संघटना आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन ही संघटना सातत्याने पत्रकारांच्या नाय हक्कासाठी प्रयत्नरत दिसुन येते. महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय बोर्डे सर हे सतत पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतात बोर्डे सरांची संघाप्रती असलेली तळमळ व पत्रकारांशी असलेला स्नेहभाव कामाप्रती आसलेली जागृत वृत्ती आणेक पत्रकारांना भावत असल्याचे दिसून येते.

संजय बोर्डे सरांनी नुकतेच बीड जिल्ह्य़ातील किर्ती 24 न्युज पोर्टलचे विश्वनाथ शरणागत यांची महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या राज्य संपर्क पदी नियुक्त केले असल्याचे जाहीर केले असून विश्वनाथ शरणागत हे आपल्या न्युज पोर्टलच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक प्रश्नाचा ऊहापोह करत असतात. विश्वनाथ शरणागत यांना विविध सामाजिक संस्थांकडुन पत्रकारीता पुरस्कार हि मिळालेले आहेत.

त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे सरांनी महाराष्ट्र प्रमुख पदी शरणागत यांची निवड केली असून त्यांच्या या निवडी मुळे आणेक राजकिय, अराजकिय, सामाजिक, शासकीय, प्रशाकिय व पत्रकारितेतील मान्यवरांनी प्रतेक्ष भेटुन व भ्रमणध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन या संघटनेमध्ये कार्यरत राहण्यासाठी असोसिएशनचे राज्य संपर्क प्रमुख विश्वनाथ शरणागत यांच्याशी संवाद साधतण्यात यावा असे महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. संपर्क+91 88887 72464