दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद व बुद्ध भिम गित तसेच व्याख्यान

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 15 फेब्रुवारी):- तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) येथील विश्वशांती पवारणा धम्मभूमी येथे माघ पोर्णीमा निमित्य दिनांक 10 फेब्रुवारीला बौध्द धम्म परिषद व बुध्द भिम गित तसेच व्याख्यानाचे कार्यक्रम संपन्न. नान्होरी ते तोरगाव रस्त्याच्या जवळच असलेल्या विश्वशांती पवारणा धम्मभूमी येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2023 ला सकाळी भिक्खु संघाचे आगमन व स्वागत, ध्वजारोहणानंतर समता सैनिक दल शाखा लाखापूरच्या वतिने भिक्खू संघाला मानवंदना देण्यात आली. यावेळी भिक्खू डॉ. धम्मसेवक महाथेरो नागपूर, भदंत संघकिर्ती महाथेरो आणि त्यांचा संघ नागपूर, भिक्खू डॉ. धम्मोदय महाथेरो, भिक्खू विनयकिर्ती नागपूर, भिक्खू धम्मानंद नागपूर, आणि भिक्खू संघ इत्यादी उपस्थित होते.

यांनी बौद्ध अनुयायांना धम्मदेशना दिली. दुसऱ्या सत्रात दुपारी 12.30 ते 3 वाजतापर्यंत व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनजी शेंडे (अध्यक्ष विश्वशांती पवारणा धम्म् भुमी सेवासमिती), उद्घाटक मा. प्रमोदजी शेंडे (उपसरपंच दिघोरी), सहउद्घाटक मा. इजि सचिनजी कडीखाये ब्रम्हपुरी, प्रमुख वक्ते प्रा. आकाश मेश्राम, डॉ. सरोज जीवने, डॉ. डी. टी. मेश्राम ब्रम्हपुरी, डॉ. यादव रामटेके ब्रम्हपुरी, मा. विनोद रणदिवे (भूमी अभिलेख) ब्रम्हपुरी, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्य करणा-या व्यक्तिंचे संमितीतर्फे सत्कार करण्यात आले. सत्कारमूर्ती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. मारोतरावजी कांबळे, मा. इजि. सचिनजी कडीखाये यांचे तथागताची मुर्ती व शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, सोनबाजी शेन्डे, विनोदजी रणदिवे (निमतादार भूमी अभिलेख) ब्रम्हपुरी, पेंटर सुभाष रामटेके मौशी, रघु मेश्राम नान्होरी मिलींद सेमस्कर (राऊंड ऑफिसर) ब्रम्हपुरी, हेमंत रामटेके (ग्रामसेवक) दिघोरी, यांचा सत्कार करण्यात आला.

तिसऱ्या सत्रा मध्ये आयुष्यमान मनोज कोटांगले व संच यांचा बुध्द भिम गितांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भिमरावजी बनकर साहेब ( तालुका अध्यक्ष कोतवाल संघटना), उद्घाटक मा. अशोक शेंडे (बांधकाम ठेकेदार व सामाजिक कार्यकर्ते दिघोरी, सहउद्घाटक मा. मनोज हुमने ( धान्न् व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ता) कोलारी, हे उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समितीचे अध्यक्ष मदन शेन्डे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, सचिव किशोर खापर्डे, सहसचिव विश्वंभर भानारकर, कोषाध्यक्ष चेतन नान्होरीकर, सदस्य शंकर शिंगाडे, नरेश रामटेके, प्रफुल फुलझेले, मधु बनकर, पुष्पा मेश्राम, अनुसया रामटेके तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक मेश्राम नान्होरी, रंजित शेंडे नान्होरी, समिर बोरकर (ग्रा.पं.सदस्य) दिघोरी, चंद्रभान बागडे दिघोरी, देवकाबाई मेश्राम (माजी ग्रा.पं. सरपंच), मिथुन रामटेके दिघोरी, विनोद डांगे तपाळ, भिमराव गजभिये तोरगावं, केवळ रामटेके तोरगाव, मनोज रामटेके बेलगाव, सुरेश हुमने कोलारी, अविनाश रामटेके बेलगाव, समिर रामटेके तोरगाव, संतोष रामटेके तोरगाव, अरविंद मेश्राम इरव्हा, किशोर मेंढे मौशी, यशवंत गणविर चांदली, रमाकांत गायकवाड मायर, गौतम सोनडवले मरारमेंढा, चिंतामणी मेश्राम लाखापूर, प्रमोद बनकर कालेता, निशाताई मधुकर बननकर ब्रम्हपुरी, डॉ. रविंद्र गजभिये पान्होरी, प्रा. सत्येंद्र सोनटक्के ब्रम्हपुरी, तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दिघोरी / नान्होरी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन विद्या देवेन सुखदेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश रामटेके यांनी केले.