मिरगाव येथे पाण बुडी मोटर सह साहीत्य चोरनारा चोर तलवाडा पोलिसानी अवघ्या चोवीस तासात घेतला ताब्यात

32

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.16फेब्रुवारी):-तालुक्यातील तलवाड़ा पुलिस स्टेशन हद्दितील मिरगाव येथील रिवाइंडिंग दुकानात रिपेयरिंगला आलेले पाण बुडी मोटर सह साहीत्य चोरी गेल्याची तक्रार तलवाड़ा पुलिस स्टेशन येथे अन्नासाहेब प्रह्लाद गोडबोले , यांच्या फ्रिरीयादीवरून अज्ञात चोराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तलवाड़ा पुलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना,आंधळे यांच्या कडे तपास देण्यात आला होता पुलिस कर्मचारी आंधळे, पोह अलगट, पोह बागलाने यांनी तपासाचा चक्र जलद गतीने सुरू केला अवघ्या चोवीसतासात चोरी गेलेली मोटर सह सहीत्य व आरोपी भरत निवृत्ती उमाप वय वर्ष ३५ रा मिरगाव यास ताब्यात घेण्यात आले आहे या कामगिरीचे तलवाडा पोलिसाचे परीसरातून कौतूक होत आहे.