क्रांतीकारी सेवालाल महाराज चौकाची स्थापना

38

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17फेब्रुवारी):-गोरसेना गोर बंजारा समाजातील अग्रगण्य असलेली गोरसेना या सामाजिक संघटने कडून उमरखेड रोड येथे क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज फलकाचा अनावरण सोहळा काल सेवालाल महाराज जयंती निमित्य 15 फेब्रुवारी 2013 रोजी गोरसेनाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पाडण्यात आला क्रांतिकारी सेवालाल महाराज हे स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान युद्ध असून त्याची कीर्ती सर्व जगभर पसरावी व क्रांतिकारी सेवालाल महाराजा विषयी व त्यांचे विचार इतिहास जनसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी गोरसेना कडून चौकाची स्थापना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर करण्यात आली आहे.

सद्गुरु सेवालाल महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण मंडळांनी एकत्रित येऊन समाजाचा स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती विठ्ठल चव्हाण गोरसेना विभागीय उपाध्यक्ष उमेश राठोड जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष जय राठोड तालुका उपाध्यक्ष विलास आडे तालुका सचिव सुमित राठोड व सर्कलचे सर्व सर्कल प्रमुख व सर्व समाज बांधव उपस्थित होते उपस्थित होते