भांडुप मध्ये भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत

35

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.17फेब्रुवारी):- परभणी ते चैत्यभूमी तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी व थायलंडचे 110 भन्तेजी यांचे भांडुप मध्ये भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी भांडुप तालुका व सर्व धम्म उपासक उपासिकांनीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचे अस्थि धातू यांचे मुंबई नगरीत प्रवेश होताच त्यांची जंगी स्वागत भांडुप विभागातील सर्व पक्षीय धम्म उपासक उपासिकांनी उत्स्फूर्तपणे केले. यावेळी विश्वास सरदार ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, सुभाष मांदळे, भांडुप तालुका अध्यक्ष अनिता ताई कांबळे, भांडुप तालुका महिला अध्यक्ष, अजय ससाने यूवा अध्यक्ष भांडुप तालुका, नागेश खैरमोडे, वार्ड अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ बावा, भास्कर तुपे, गोपीनाथ इंगळे, सुनील सुरडकर, सुभाष वाकोडे, राहुल पवार, रमेश इंगळे गुरुजी, अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यकते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पत्रकार साहित्यिक सागर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म उपासिका सुनिता उदेभान तायडे, चंद्रकला सागर तायडे, विजया प्रभाकर वानखडे, गीता पद्माकर घोलप, प्रिती गौतम तायडे, स्तुती राजु वाकोडे, सविता संतोष तायडे, जया नंदु धादोरे, सुजाता विजय वाघ, सोनु संदीप वाकोडे, सुनिता जेस्कन यांनी फुलांनी भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे हार्दिक स्वागत आणि सुस्वागतम, लिहून आणि रांगोळी काढून ऊत्तम प्रकारे सजावट केली होती, त्यासोबत उभे राहून हजारो उपस्थितीत व सहभागी उपासकांनी फोटो काढले. सोशल मीडियावर ते फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बौद्ध धम्म पदयात्रेत सहभागी होऊन भांडुप विभागातील रहिवाशांनी आपली संघ शक्ती दाखवून दिली.त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.