पं.दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

29

🔹शहरातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत होणार भर्ती

✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा (घा)(दि.24फेब्रुवारी):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरात प्रथमच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था कारंजा (घा),जिल्हा:- वर्धा व जिल्हा कौशल्यविकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २७/२/२०२३ रोज सोमवारला ,शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था कारंजा घाडगे नॅशनल हायवे क्रमांक ६ ,येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कारंजा तालुक्यातील दहावी, बारावी पदविका,पदवीधर व आयटीआय धारक नवयुवक बेरोजगारांनी या मेळाव्यात उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा व आपल्या कुटुंबाचे जीवन सुखमय करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक काटोल व नवकिसान बायोप्लांट लिमिटेड अमरावती या कंपनीसाठी क्रेडिट ऑफिसर व फिल्ड ऑफिसर या दोन पदाच्या एकूण ११० जागेसाठी भरती होणार आहे.या रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी ९०४९१३६८४७ या नंबर वर संपर्क करावा असे शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था येथील प्राचार्य कोडापे यांनी सांगितले.