शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे भडगाव पाचोरा परिसरात शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधन…

31

🔹शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.26फेब्रुवारी):- भडगाव पाचोरा परिसरातील गाळण, वडली, घुसर्डी, खडकदेवळा इ. ठिकाणी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्या व्याख्यानांचे आयोजन करून शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाले.

पहिले पुष्प – शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पाचोरा तालुक्यातील गाळण बु.गावात ग्रा.पं.कार्यालय जवळ महाशिवरात्री च्या दिवशी शिवजयंती चे औचित्य साधून वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. विचारधारेचे साथी योगेश सोनवणे यांच्या माध्यमातून गावात येण्याचा योग जुळून अवलंबआणि समस्त ग्रामस्थ गाळण बु. यांच्या वतीने करण्यात आले होते.

दुसरे पुष्प – रविवार, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी वडली (वावळदा) येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवजयंती च्या दिवशी राजेंच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करण्यात आला. गावातील युवकांनी नाचून नाही तर विचारांचा जागर ऐकून साजरी केली. कार्यक्रमाला डॉ.अरुण पाटील यांच्या माध्यमातून येण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ वडली यांच्या वतीने करण्यात आले होते.

तिसरे पुष्प – सोमवार, २० फेब्रुवारी दुपारच्या सत्रात शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे डी.फार्मसी आणि बी.फार्मसी च्या विद्यार्थांच्या फ्रेशर्स डे च्या कार्यक्रमात शिवविचार रुजविणाची संधी मिळाली. युवक युवतींच्या समोरील आव्हाने, आई वडिलांची महती, जगण्याचा संकल्प हे सर्व समजून घेणं म्हणजेच शिवविचार जगण्याचा प्रयत्न करणं. या देखण्या कार्यक्रमाला संस्थेचे उपप्राचार्य डॉ.पराग अरुण कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला येण्याची संधी अजिंक्य जोशी सरांच्या माध्यमातून मिळाली.

चौथे पुष्प – सोमवार, २० फेब्रुवारी २०२३ रात्री पाचोरा तालुक्यातील घुसर्डी बु.येथे मारोती मंदिर जवळ गावकऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा वैचारिक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला विचारधारेचे साथी भद्रे सर आणि भैय्यासाहेब विश्वनाथ वसंत पाटील यांच्या माध्यमातून येण्याची संधी लाभली. कार्यक्रमाचे आयोजन शिव मराठा मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ घुसर्डी बु. यांच्या वतीने करण्यात आले होते.

पाचवे पुष्प – बुधवार, २२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथे मेन चौकात शिवजयंती चे औचित्य साधून वैचारिक प्रबोधन संपन्न झाले. आमचे सन्मित्र नंदू पाटील यांच्या माध्यमातून गावात येण्याचा योग जुळून आला. कार्यक्रमाचे आयोजन आनंद भाऊ युवा फाउंडेशन खडकदेवळा बु.यांच्या वतीने करण्यात आले होते.

विविध गावांमध्ये शिवरायांचे खरे कर्तृत्व, शिवनीती, आजच्या युवकांपुढील आव्हाने, शिवविचार काळाची गरज, मानव प्रतिपालक शिवराय, शिवरायांचे शूर सरदार इ. विविध विषयांच्या माध्यमातून राजेंचा खरा इतिहास सांगून जागृती पेरण्याचं काम व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी केले