नेमकं चाललंय काय?…राजकारण की समाजकारण

93

खेडेगावातील राजकारण हे फार गुंतागुंतीचे बनत चालले आहे. राजकारण म्हटल्यानंतर वादविवाद आलेच परंतु राजकारणाने मनुष्य एवढ्या खालच्या पातळीला येऊन पोहोचेल याची कल्पना करणे शक्य नव्हते पण माझ्याच गावातील राजकारणा मधून मला ते अनुभवायला मिळाले. राजकारण म्हटल्यानंतर एक हरत असतो आणि एक जिंकत असतो हे निश्चित असते परंतु गावातीलच काही लोकांकडून ज्यांना राजकारणातला एकही डाव माहीत नसतो आणि स्वतःला दीड शहाणे समजून आपण राजकारणात किती पारंगत आहोत हे शब्दशः सांगणाऱ्या लोकांकडून वेळोवेळी अपेक्षित कृत्य घडल्या जात.

मी मागील काही वर्षापासून अनुभव होत आहे की राजकारण हे मुळीच राहिले नाही. म्हणजे असं की औपचारिक पद्धतीचे राजकारण राहिले नाही तर राजकारण हे अनौपचारिक पद्धतीने सुरू आहे याच राजकारणाचा आधार घेऊन काही व्यक्ती स्वतःला राजकारणाचा महामेरू समजत राजकारणामध्ये समाजकारण घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि असं केल्यानंतर त्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत आपल्यासारखा दुसरा विद्वान कोणी नाही याची सद्यस्थिती आहे. पण एक प्रकारे बघितलं तर राजकारण हे त्या ठराविक वेळेपुरतं असायला पाहिजे पण खेड्यामध्ये असं होताना दिसत नाही. राजकारणाच्या आडून समाजकारण घडवल्या जातात आणि फक्त एका विशिष्ट जातीला विरोध करून राजकारण खेळला जातो . आणि काही मद्यपी लोकांकडून ठराविक जातीला मध्य प्राशन करून जातीवाचक शिवीगाळ केली जाते आणि जाब विचारला गेले असता स्वतः स्वतःवर वार करून किंवा खोटी ॲट्रॉसिटी ची केस लावण्याची धमकी वारंवार देण्यात येते हे खेड्यातील सद्यस्थिती आहे.

वास्तविक पाहता कोणताच समाज कमकुवत नसतो किंवा कोणी कोणाला मुळीच घाबरत नसते पण समजदार व्यक्ती हा आपल्या समजूतदारपणामुळे शांत बसलेला असतो आणि लोकांना वाटतं की आपल्या भीतीने ते गप्प आहेत तर असं काहीही नसतं मनात आलं तर समजूतदार व्यक्ती बरच काही करू शकतो परंतु तो भितो फक्त इज्जतीला कारण इज्जत एक अशी गोष्ट आहे जी कधीही विकत घेता येत नाही ती कमवावी लागते आणि जर का एकदा गेली तर कधीही परत येत नाही असो या लेखातून मला एकच गोष्ट सांगायची आहे गावातील राजकारण हे फक्त काही ठराविक वेळ पुरत ठेवा आणि आपला माणूस सत्तेवर आला म्हणून त्याचा गैरवापर करू नका उलट गावाचा कसा विकास होईल याबाबत विचार करा.

✒️लेखक:-स्वप्निल गोरे(सावरगाव गोरे,तालुका- पुसद,जिल्हा- यवतमाळ)मो:-8767308689