कवी संमेलनात निवडक कवींना विश्वरत्न पुस्तकाने सन्मानित करण्यात येणार!

32

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.27फेब्रुवारी):-समता साहित्य लोककला केंद्र ही संस्था लोकशाहीर लक्ष्मणजी देठे कवी “मनोहर” यांच्या साहित्यीक प्रेरणेने हौशी कवी गायकांच्या वतीने प्रथमच जाहीर भव्य कवी संमेलन घेण्यात येत आहे. त्या कवी संमेलनात आनंद पारगांवकर लिखित विश्वरत्न पुस्तकाने निवडक कवींना सन्मानित करण्यात येईल, विशेष म्हणजे विश्वरत्न पुस्तकांचे मुखपृष्ठ आनंद पारगांवकर यांच्या रक्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र प्रसिद्ध चित्रकार अशोक सुतार यांनी काढलेले आहे. आता पर्यंत 5 हजार प्रती विकल्या गेल्या आहेत, प्रथम आवृत्ती 2017 ला काढली होती, दुसरी 2022 ला काढण्यात आली होती, रक्ताने काढलेल्या चित्र विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी येथे ठेवण्यात आले आहे, प्रथम आवृत्तीचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते दादरच्या चैत्यभूमी वर करण्यात आले होते.

समता साहित्य लोककला केंद्र भांडुप विभागातील आणि मुंबई परिसरातील समस्त कलावंतांच्या हितासाठी लढण्याचे ब्रीद घेऊन कार्य करणारी संस्था आहे. लोककला गुणांना प्रोत्साहन देऊन प्रशिक्षण देऊन कला, कौशल्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी समता साहित्य लोककला केंद्र या संस्थेची स्थापन करण्यात आली आहे.लोककला गुणाला विशेष कौशल्याला योग्य संधी मिळवून देण्यासाठी प्रथमच संस्थेच्या वतीने १२ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत रामकली विद्या मंदीर केदारे चौक भांडूप पश्चिम मध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनांचे अध्यक्ष सागर रामभाऊ तायडे, संस्था अध्यक्ष लोकशाहीर लक्ष्मणजी देठे गुरुजी, ज्येष्ठ कवी यांना घेऊन आनंद पारगांवकर यांना आमंत्रण देण्यासाठी गेले असता, त्यांचा त्यांना खूप आनंद झाला तेव्हा त्यांनी निवडक कवींना विश्वरत्न पुस्तक माझ्या तर्फे मोफत देण्याचे आश्वासन दिले. योग्य कवींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यापेक्षा कायमस्वरूपी ज्ञान देणारे पुस्तक देऊन सत्कार करण्यात यावा ही संकल्पना आनंद पारगांवकर यांनी मांडली. ती सागर तायडे, लक्ष्मण देठे गुरुजी, गौतम मोरे, श्रीकांत गायकवाड यांना आवडली. त्याबाबत संस्था पदाधिकारी अनिल गमरे, सुनिल आखाडे, रुपेश साखरे, राहुल गायकवाड, संजय गमरे, संदीप राजापूरकर, एड.जितुराज गायकवाड यांना सांगण्यात आली. सर्वांनी आनंद पारगांवकर यांच्या सूचनेचा स्वीकार करून मान्यता दिली. म्हणूनच सर्व कवींना ही आनंदाची बातमी देण्यात येत आहे.

कलावंतांनी कलावंतांसाठी समता साहित्य लोककला केंद्राची स्थापना केली आहे. त्यात सर्व कवी गायकांनी सहभागी व्हावे “प्रत्येकाचे एकच ध्येय, कलावंतांचे हीत,हे एकच ब्रिद” कवी संमेलनात भाग घेण्यासाठी लक्ष्मण देठे गुरुजी – ९३२२४२२६५७, गौतम मोरे-९६०४७०२६५९, श्रीकांत गायकवाड- ९६५३३०७६९८, यांच्याशी संपर्क साधावा असे समता साहित्य लोककला केंद्राच्यावतीने रुपेश साखरे यांनी जाहीर आवाहन केले आहे.