सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषद हजारो धम्मबांधवांच्या उपस्थितीत संपन्न

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड(दि.1मार्च):-महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्या पर्यंत पोहोचलेल्या मतखंडातील सर्वात मोठ्या धम्म परिषदेचे दिनांक 26/02/2023 रोजी रविवार ला कारखेडफाटा येथे आयोजन केले होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील आगळी वेगळी धम्म परिषद म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व महाराष्ट्रातील ख्यातनाम,सुप्रसिद्ध वक्ते ,गायक ज्या धम्मपीठावर येतात अशी ख्याती जनमानसात नेणाऱ्या सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन नालंदा नगरी कारखेडफाटा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी वार रविवार ला केले होते.सकाळी ठीक 8 वाजता ध्वजारोहण झाले.

त्यानंतर धम्मदेसना मातोश्री इशिबिन (हदगाव),भन्ते संघपाल,भन्ते शिलरत्न(नांदेड),भन्ते पय्याबोधी (नांदेड),भन्ते संघरत्न (जालना),भन्ते अश्वघोष (अमरावती),भन्ते शिवानंद (जालना),भन्ते दयानंद(मुळावा) यांच्या हस्ते बौद्ध धम्मातील मूलतत्त्वे,तत्वज्ञान व विज्ञानवादी बौद्ध धम्म जगाला कसा तारक आहे असे धम्माचे सखोल ज्ञान देण्यात आले.

त्यानंतर दुपारी 1 ते 4 पर्यंत बुद्ध,फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनारील आधारित भीमशाहिरांचा सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.या सत्रात ग्रामीण भागातील अनेक शाहिरांनी उत्कृष्ट गायन करण समाज प्रबोधन केले.

सांयकाळी 4 ते व्याख्यानमाला व कविसंमेलन झाले यामध्ये संतोष शिंदे यांचे मोडी लिपी वरील व्याख्यान झाले तसेच ग्रामीण भागातील कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

सांयकाळी 7 वाजता बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चळवळीत काम करणाऱ्या ग्रामिन भागातील लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा पार पडला.

त्यानंतर या धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण असलेले व दरवर्षी दिले जाणारे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,कलाविष्कार क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार सोहळा पार पडेल यामध्ये यावर्षीचा सामाजिक कार्याबद्दल चा पुरस्कार मुंबई येथील बालाजी कदम, शैक्षणिक कार्य शंकर हापसे, कलाविष्कार अमोल खंदारे,उत्कृष्ट पत्रकारिता आयुब खान पठाण,बाल कलाविष्कार पुरस्कार जय काळबांडे व शिरीष काळबांडे,सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचा विशेष सन्मान पुरस्कार सारनाथ रोकडे आणि उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून उमरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड साहेब यांना देण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती साहेबराव कांबळे बिडीओ तथा सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी हिंगोली, प्रा.अनिल काळबांडे,माधवराव वाठोरे,करुणाबाई कवडे,माजी आमदार विजयराव खडसे साहेब, मोहन मोरे, अरुणदादा आळणे, दादा खंदारे महापौर, सुधाकर लोमटे, सरोजताई देशमुख, किशोर भवरे,ऍड.धम्मपाल पाईकराव,गौतम कवडे साहेब उपयुक्त नांदेड मनपा,राजेंद्र कदम,भारत राऊत,सिद्धार्थ दवणे सर,मिलिंद धुळे साहेब,शिवाजी माने, चिमणाजी बापू काळबांडे, परिणीतताई गौतम कांबळे आदी मान्यवरासह कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदमुनी सरकार साहेब होते यांच्या प्रमुख उपस्थतीत हा सन्मान सोहळा होईल.

सूत्रसंचालन प्रदिप कांबळे सर व सुधाकर कवडे सर यांनी केले.त्यानंतर रात्री 11:30 वाजता सांस्कृतिक प्रबोधन संध्या मध्ये बुद्ध भीम गीतांचा वैचारिक प्रबोधनाचा सामना विकास राजा (सिने पार्श्व गायक, झी.टी.व्ही.मराठी) व अंजली घोडके (सिने पार्श्व गायिका टी. व्ही. युट्युब स्टार लातूर) यांचा सामना झाला.

या धम्म परिषदेचे आगळे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे या धम्म परिषदेचे आयोजक सुधाकरदादा कांबळे, संयोजक सुनिलभाऊ कवडे, अध्यक्ष धोंडबा विनायते, उपाध्यक्ष साहेबराव काळबांडे, सचिव चंपत विणकरे, संघटक सुरेश दवणे, सल्लागार सदाशिव वाठोरे,सहसचिव मुकिंदा कवडे,कोषाध्यक्ष गौतम दवणे साखरा,सहकोषाध्यक्ष सतिष कवडे, मार्गदर्शक एस.आर.कांबळे,गौतम दवणे चालगाणीकर,चांदराव काळबांडे,देवराव काळबांडे, भिमराव सोनूले उमरखेड,निमंत्रक भिमराव काळबांडे, सदस्य शिवाजी कवडे,सखाराम काळबांडे,भीमशाहिर अनिल आठवले,पांडुरंग वंजारे,रामराव खिल्लारे,भगवान कवडे,शिलवंत सोनाळे, दिपक(गोलु) वाठोरे,कैलास रणवीर,दिपक तु. वाठोरे, नितीन नरवाडे, बाबासाहेब सावते, बाळासाहेब सावते, किसन विनायते, बबन वाठोरे,संदिप कवडे, पेंटर गजानन काळबांडे, सहयोगी संदिप दवणे(कोब्रा),माधव आढागळे,अरविंद घोंगडे,कृष्णा राऊत(किंग),प्रविण राऊत आणि सर्व कार्यकारिणी आसपासच्या सर्व गावांना भेटी देऊन धम्मदान जमा करत या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजित केला होते.

यावेळी हजारोंच्या संख्येने धम्मबांधव उपस्थित होते.

सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषद कार्यकारिणी नालंदा नगरी कारखेडफाटा यांच्या अथक परिश्रमामुले ही धम्म परिषद संपन्न झाली.