मराठी राजभाषा दिनी कवयित्री सोनाली सहारे यांच्या ‘सूर्यविचार-सोनशिल्प’ या सुविचार संग्रहाचे प्रकाशन

43

🔸गडचिरोली येथील कवयित्री सोनाली सहारे यांचा सत्कार

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने यंदा वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ ‘भेट मराठी मनाची’ हा राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रकाशन समारंभात ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध कवयित्री सोनाली सहारे रायपुरे यांच्या चौथ्या ‘सूर्यविचार-सोनशिल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले.

यांच्या सूर्य विचार या पुस्तकाला जेष्ठ साहित्यिक ॲड लखनसिंह कटरे यांची प्रस्तावना आहे. सोनाली सहारे यांच्या संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व उद्घाटक मा. प्रभाकर दहिकर वन्यजीव मार्गदर्शक, संरक्षक व समाजसेवक, प्रमुख मार्गदर्शक व अतिथी संपादक मा.सुधाकर भुरके ज्येष्ठ कवी नागपूर, प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता खांडेकर सिनेतारका चित्रपट निर्माती नागपूर, प्रदीप ढोबळे व्याख्याते, कवी संमेलनाध्यक्ष मा. डॉ. संजय पाचभाई नागपूर, प्रमुख पाहुणे मा. विजय शिर्के छ. संभाजीनगर, नागोराव कोम्पलवार, यवतमाळ, मा. द्रवेश जनबंधू नागपूर, मा. संतोष राऊत गोंदिया, संग्राम कुमठेकर लातूर, रंजना ब्राम्हणकर गोंदिया व संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने सोनाली सहारे यांच्यासह त्यांचे वडील डॉ.एम.ए.रायपूरे, आई अर्चना रायपुरे गडचिरोली यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन अध्यक्ष राहुल पाटील व पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.