घुग्घुस शहरातील राजीव रतन चौक येथे 24 तास वाहतूक पोलीस नियुक्त करा आणि वणी -घुग्घुस मार्गावर पाणी मारण्यात यावे -आम आदमी पार्टीची मागणी

32

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.2मार्च):- मागील वर्षभरापासून राजीव रतन चौकातील उड्डाणपूल चे बांधकाम कासवगतीने सुरू आहे व दोन महिन्याआधी वेकोली घुग्घुस द्वारे लोहापुलिया सुध्दा बंद करण्यात आला जेणेकरून शिवनगर सहित संपुर्ण रेल्वे लाईन अलीकडच्या क्षेत्रातील नागरिकांना दळणवळण करण्याकरिता एकमेव मार्ग म्हणजे घुग्घुस-वणी मुख्य मार्ग उरला आहे. पण या मार्गावर डब्लू सी एल रेल्वेमुळे रेल्वे फाटक दर 10-15 मिनिटाला पडतो म्हणून इथे ट्राफिक जाम सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही याकरिता जोपर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी आणी या मार्गावर धुळीचे प्रमाण सुद्धा इतके वाढले की 5 फूट अंतरावर सुद्धा दिवसांनी दिसत नाही म्हनून दर 2 तासांनी वियानी विद्या मंदिर स्कूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम पर्यंत पाणी मारण्यात यावे.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन क्षिरसागर, सचिव संदीप पथाडे, सहसचिव , सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.