चौसाळा येथील चंदन शहावली याञा कमिटी अध्यक्षपदी उपसरपंच अंकुश कळासे तर उपाध्यक्षपदी विवेक कुचेकर यांची निवड

43

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.3मार्च):-(चौसाळा)बीड तालुक्यातील चौसाळा येथील मधील सर्व धर्मियांचे ग्रामदेवत असलेले हजरत चदंन शहावली बाबा ऊरूस याञा दि.२३ मार्च ते २६ मार्च २०२३ या दरम्यान होणार असुन यासाठी कमिटी स्थापन करण्यासाठी दिनांक ०२ मार्च रोजी सकाळी दहा वाजता चंदन शहावली बाबाच्या दर्गापरिसरात सर्व चौसाळा शहरवासीयांची बैठक घेण्यात आली.

या मध्ये या बैठकीमध्ये मागील वर्षाच्या हिशोबाचा लेखाजोखा देऊन या चर्चेसह नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यासाठी चर्चा करून सर्वानुमते अध्यक्षपदी चौसाळा शहराचे उपसरपंच अंकुश कळासे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले चौसाळा शहरातील युवा नेते विवेक कुचेकर यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी चौसाळा ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित चौसाळा शहरवासियाकडुन अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीस चौसाळा शहरातील जेष्ठ नागरिक,युवा कार्यकर्ते,नेतेमंडळी,पञकार व चौसाळा शहरातील रहिवासी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते