नाम फाउंडेशन व शारदा प्रतिष्ठान व सिरसदेवी ग्रामपंचाय च्या संयुक्त विद्यमाने मुळुबाईवडा नदी खोलीकरण कामाचे होणार उद्घाटन

32

🔸माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते होणार उद्घाटन

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.3मार्च):- तालुक्यातील सिरसदेवी ग्रामपंचायत अंतर्गत नदी खोलीकरण कामाचे सूरुवात होणार असुन या कामात नाम फाउंडेशन व शारदा प्रतिष्ठान गेवराई चे विशेष सहकार्य लाभणार आहे सिरसदेवी येथील मुळुबाई वडा नदी येथे कामाची सुरुवात मा बीड जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे मुळुबाई वडा नदी खोलीकरण सरळीकरण जलसंधारण काम सिरसदेवी ग्रामपंचायतचे सरपंच मा रवींद्र बप्पा गाडे यांच्या पुढाकारातून हे काम होत असून नाम फाउंडेशन व शारदा प्रतिष्ठान गेवराई यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे या कामात लोकसहभाग ही लाभणार असून परिसरातील नागरिक पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन मा सरपंच रवींद्र बप्पा गाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावाला पाण्याची टंचाई भासु नये यामुळे सदैव जलसिंचन जलसंधारण कामात तत्पर आसणारे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या दूरदृष्टीने मा सरपंच रवींद्र बप्पा गाडे यांच्या पुढाकारातून येथील मुळुबाई वडा नदीचे खोलीकरण सरळीकरण कामाची सुरुवात दि 3/3/2023 रोजी सकाळी 10 वा नाम फाउंडेशन व शारदा प्रतिष्ठान गेवराई व सिरसदेवी ग्रामपंचायत लोकसहभागातून संयुक्त विद्यमाने हे काम मा बीड जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे तरी परीसरातील नागरिकांनी पदाधिकारी शेतकरयांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा सरपंच रवींद्र बप्पा गाडे यांनी केले आहे