वेकोलिचा लोखंडी पुल दुचाकीच्या रहादारीकरीता सुरु

35

🔹भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून पुलाचा शुभारंभ

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.4मार्च):- शहरातील बँक ऑफ इंडियाजवळील वेकोलिचा लोखंडी पुल दुचाकीच्या रहादारीकरीता शनिवार, ४ मार्च रोजी सकाळी सुरु करण्यात आला.भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून पुला शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यापारी असोसिएशनतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

बँक ऑफ इंडियाजवळ वेकोलि परिसराला जोडणारा ३० वर्षे जुना लोखंडी पुल रेल्वे प्रशासनाने १९ जानेवारीपासून दुचाकीच्या रहदारीसाठी बंद केला होता. जवळपास दोन महिने हा पुल बंद होता.राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याने शालेय बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता. तसेच रुग्णवाहिका, महामंडळाच्या बसेस अडकल्याने रुग्णांना व प्रवाश्यांना फटका बसायचा.

वेकोलि परिसरात इंदिरानगर, गांधीनगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर, शालिकरामनगर अशा मोठया वसाहती आहेत. या वसाहतीत राहणाऱ्यांसह घुग्घुस वस्तीत राहणारे दुचाकी वाहनधारक लोखंडी पुलावरून ये-जा करीत होते. परंतु पुल बंद झाल्याने त्यांना राजीव रतन चौकातून वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे घुग्घुस वस्तीतील व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हा लोखंडी पुल नागरिकांच्या रहदारीसाठी सुरु करण्याकरिता वेकोलि अधिकारी व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार २६ जानेवारी रोजी घुग्घुस शहरात आले असता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या लोखंडी पुलाच्या समस्येबाबत त्यांना सांगितली व प्रत्यक्ष वेकोलिच्या लोखंडी पुलाची पाहाणी केली होती.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्काळ समस्येची दखल घेत रेल्वेचे अधिकारी व वेकोलिचे महाप्रबंधक यांना निर्देश देत लोखंडी पुलाची दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरु करण्यास सांगितले होते.त्याअनुषंगाने वेकोलिने लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले.वेकोलिच्या लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने दुचाकीच्या रहादारीकरीता सुरु करण्यात आला.

त्याअनुषंगाने व्यापारी बांधवांनी फटाके फोडून आनंदउत्सव साजरा केला व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि भाजपाचे आभार व्यक्त केले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, चिन्नाजी नलभोगा, राजेश मोरपाका, शाम आगदारी, प्रवीण सोदारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गुप्ता, सन्नी खारकर, दिनेश बांगडे, आकाश निभ्रड, साजन गोहने, सोनल भरडकर, प्रवीण बनपूरकर, मुस्तफा शेख, सोनू पाटील, अविश चटप, गोकुल तुराणकर, छोटेलाल वर्मा, सोनू नंदवानी, तुषार कटारे, जंगलू मांडवकर, दीपक नंदवानी, आस्तिक गौरकार, शुभम ठाकरे, संजय वर्मा, हर्षल उरकुडे, उपस्थित होते.