चार्वाकवनातील धम्मसंगितीत २२ प्रतिज्ञावरील चर्चा संपन्न

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7मार्च):-चार्वाक वनात दि.५ मार्च रोजी
फाल्गुन पौर्णिमानिमित्त धम्मसंगितीत डाॕ.बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञावर सुरू असलेल्या चर्चेचा समारोप झाला. या समारोपीय धम्म संगितीत प्रतिज्ञा क्र. १८) ज्ञान ( प्रज्ञा ), शिल , करूणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

१९ ) माझा जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानीकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो.२०) तो सद्धम्म आहे ,अशी माझी खात्री पटलेली आहे. २१ ) आज माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो. २२) इतःपर मी बुद्धाच्या शिकवणूकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञावर सखोल चर्चा झाली.

धम्मसंगितीच्या अध्यक्षस्थानी से. नि. जिल्हाधिकारी मनोहरराव भगत होते. चर्चेत सर्वउपासक पी. बी. भगत, मा. ल. धुळध्वज, टी. बी. कानिंदे, विठ्ठलराव खडसे, गोवर्धन मोहिते, नागोराव खंदारे यांनी भाग घेतला.चर्चेपूर्वी तुकाराम चौरे यांनी बौद्ध धम्मातील फाल्गुन पौर्णिमेचे महत्व विशद केले आणि चर्चेला सुरूवात झाली.संगितीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी धम्मसंगितीत प्रथमतः च उपस्थित झालेले विठ्ठलराव सुदामराव खडसे, मधुकर किसन हनवते आणि उपासिका ललीता विठ्ठलराव खडसे यांचे पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

धम्मसंगितीत सर्व उपासक साहेबराव गुजर, उपासिका ललीता खडसे, मधुकर हनवते, यशकुमार भरणे, अनिल डोंगरे, चंद्रमणी गायकवाड, सुधाकरराव चापके, यशवंतराव देशमुख, सुधाकरराव पांडुरंग भगत, चंद्रकांत आठवले, विश्वनाथराव जोहरे, शामराव वाकोडे, प्रदीप तायडे, विश्वजीत भगत हे उपस्थित होते.म.फुले समता विचार मंचचे विश्वस्त गोवर्धन मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले व संगिती कामकाम दि.५ एप्रिल पर्यत स्थगित केले.दिनांक ५ एप्रिल रोजी होणाऱ्या धम्म संगितीत चार्वाक दर्शन या विषयावर चर्चा होईल असे धम्मसंगितीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी जाहीर केले.