भाजपा तालुका मित्र परिवारांकडून अपघात ग्रस्त महिलेला आर्थिक मदत

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी (दि. 8 मार्च):-भारतीय जनता पार्टी शाखा ब्रह्मपुरी व मित्र परिवाराकडून रणमोचन येथील अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या योगिता विनोद दोनाडकर या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत केली.दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणमोचन गावातील दोनाडकर परिवार व काही आप्तेष्ट नातेवाईक लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात नामकरण विधीच्या कार्यक्रमाला मालवाहक मिनीडोरने जात असतांना अचानक ब्रह्मपुरी टिळक नगर येथे मुख्य रस्त्यावर मिनीडोर पलटी होऊन अपघात घडला होता. त्यात बऱ्याच महिला व लहान मुले गंभीर जखमी झाले होते मात्र काही महिलांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती.

वेळीच जखमींना ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते त्या प्राथमिक उपचारानंतर पर्याव्यवस्थेनुसार काही जखमींना खाजगी दवाखान्यात तर गंभीर काही महिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र योगिता विनोद दोनाडकर या महिलेला गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली होती गडचिरोलीतील उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने ब्रह्मपुरी येथील पेशेट्टीवार हॉस्पिटल मध्ये उपचार केले.

मात्र सध्या या महिलेवर चौगान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबाची हालाकीची परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी व मित्र परिवारांच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रणमोचन येथील योगिता विनोद दोनाडकर यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करीत आर्थिक मदत केली.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे , भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा, सालोडकर सर, गृहशोभा फर्निचरचे मालक तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश भरै, विनोद झोडगे यांची उपस्थिती होती.