जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मिठाईसह खाऊचे वाटप

32

🔸गेवराईत माहेश्वरी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:;9075913114

रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महांडूळा संचलित, कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय येथे जागतिक महिला दिना निमित्त गेवराई माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाईसह खाऊचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी शाळेच्या वतीने आभार पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

गेवराई माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.तर बुधवार दि.८ मार्च रोजी अनावश्यक खर्चाला फाटा देत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिठाईसह खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी सौ.रजनी राधेश्याम अट्टल, नम्रता सिकची, अनिता भुतडा, अंजली बलदवा, तरिका लोहिया, शारदा सोमाणी, मथुरा सोमाणी, किरण लाहोटी सह माहेश्वरी महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.