बातमी प्रकाशित का केली म्हणून पत्रकारावर हल्ला

38

(दोषीवर कारवाईची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे मागणी)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 8 मार्च):-माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का लावली याचा जाब विचारत निंगणुर येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्यावर ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने हल्ला करत शिवीगाळ केली.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की येथील निंगणूर येथिल तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर गेल्या सोळा वर्षांपासून आपला डेरा टाकून बसलेल्या मुडे नामक व्यक्तीची बातमी सौदागर यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती.

त्याचा डाग मनात ठेवून ओम प्रकाश मुडे याने पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केला.

मनोद्दीन सौदागर यांच्यावरचा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारांचा हल्ला. यामुळे पत्रकारांची गळचेपी होऊ शकते. व स्वातंत्र्य लिखाणाला मर्यादा येऊ शकतात ही बाब ध्यानात घेउन त्संतापलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेने स्टेशन बीटरगाव गाठत ठाणेदार प्रताप भोस यांना निवेदन सादर केले.

व दोशीवर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमन 2019 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.