आजचा जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला-मंजुषा दर्डा

70

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8मार्च):-भोलाराम कांकरिया ट्रस्ट नेहमीच मदतीसाठी पुढे व धावुन येते असते असाच एक प्रसंग दिनांक 3 मार्च च्या रात्री पोखर्णी वाळके शिवारातील एका गरीब कुटुंबीयांवर आला आगीच्या बक्षस्थानी आशाबाई गुरव यांचा संसार जळून खाक झाला ,घरातले सगळे सामान धान्य कपडे जळून खाक झाले ही बातमी न्यूज लोकनायकच्या माध्यमातून कळताच भोलाराम कांकरिया ट्रस्टच्या मंजुश्री दर्डा यांनी क्षणाचा विलंब न करता प्रथम या कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य व धान्य याची व्यवस्था केली त्यात कपडे भांडे व धान्य यांचा समावेश होता.

या घटनेने पीडित आशाबाई गुरव या भारावून गेल्या कारण घरातील सर्व सामान जळून राख झाल्यावर माणूस काय अवस्थेत असतो हे त्या माऊलीलाच माहित पण सामाजिक जाणीव असणारे घटक आजही कायम आहेत याचे चित्र बघायला मिळाले त्यामुळे गुरव कुटुंबाच्या जळालेल्या संसार संसारावर मायेची व हिमतीने उभे राहण्याचे बळ देऊन भविष्यात ही न खचता गरजेच्या वेळी कायम सोबत राहण्याचे अभिवचन दिले. यावेळी कुटुंबातील आशाताई गुरव यांचे डोळे भरून आले होते यावेळी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते. लोकांनीही वर्गणी करून घर उभे करून यासाठी मदत जमा केली आहे.

त्यामुळे माणुसकी जिवंत आहे असेच म्हणावे लागेल त्यामुळे आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना भोलाराम कांकरिया ट्रस्टच्या मंजुश्री दर्डा कुटुंबातील आशाताई गुरव या दोन्ही महिला असताना एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या दुःखात सहभागी होऊन तिचे अश्रू पुसून तिचा मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात दिला त्यामुळे आजचा जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असेच म्हणावे लागेल.