चिमुर येथे तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी तर्फे डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात “हाथ से हाथ जोडो” अभियानाला सुरुवात

32

🔹महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थित

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8मार्च):– भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रीय नेत्यां सोनियाजी गांधी, व खासदार राहुलजी गांधी, आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वखाली डॉ.अविनाश वारजुकर, माजी आमदार तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई या सर्व नेते मंडळी यांच्या आदेशाने डॉ. सतिश वारजुकर 74 चिमुर विधानसभा समन्वयक तथा माजी अध्यक्ष जि. प.चंद्रपूर यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.नामदेव किरसान यांच्या उपस्थित व तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस,तालुका व शहर महिला काँग्रेस, तालुका व शहर युवक काँग्रेस कमिटी तसेच तालुका व शहर ओबीसी सेल यांच्या समन्वयाने चिमूर शहरात सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दिनांक 09/03/2023 रोज गुरुवारला दिलेल्या कार्यक्रमानुसार “हाथ से हाथ जोड़ो” या अभियानाची सुरुवात होत आहे. या हाथ से हाथ जोडो अभियानात सर्वाणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ विजय गावंडे पाटील यांनी केले आहे.

“हाथ से हाथ जोड़ो” अभियानाच्या यशस्वितेकरिता सहकार्य करावे या अभियानाचे आयोजन अध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी, चिमुर अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी,अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, चिमुर, अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी सेल चिमुर, अध्यक्ष महिला कांग्रेस कमिटी, चिमुर शहर कांग्रेस कमिटी, तालुका महिला काँग्रेस कमिटी, शहर महिला काँग्रेस कमेटी यांनी केले.

*कार्यक्रमाची रूपरेषा खाली दिलेल्या प्रमाणे*
दुपारी ठीक 3 वाजता डॉ. सतिश वारजुकर यांच्या जनसंपर्क कार्यालय पासुन हाथ से हाथ जोडो चा शुभारंभ करून यात्रेला सुरुवात हजारे पेट्रोल पंप चौक येथुन हॉटल सावजी, मासळ रोडणे चावडी चौक, भरत कावरे ज्वेलर्स मार्गे शिवाजी चौक, सोनु सेल मार्गे S B I बैंकला घेराव करून निवेदन देऊन यात्रा समोर नेताजी वार्ड राम मंदीर, ते नेहरू विद्यालय, मेन रोड मार्ग शहीद बालाजी रायपूकर चौक, नेहरू चौक , जामा मस्जिद चौक, इंदिरा गांधी चौक, इंदिरा नगर, हुत्तमा स्मारक, बस स्टॉप, हजारे पेट्रोल पंप चौक, आणि समारोप तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे करण्यात येईल.