वाठोडा येथे १७, १८, १९ मार्चला भव्य यशवंत शंकरपटाचे आयोजन !

37

🔸लाखो रुपयांची बक्षिसे ; महिला धुरकरी ठरणार शंकर पटाचे आकर्षण !

🔹जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून शंकर पटामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.13मार्च):-शासनाने शंकर पटावरील बंदी उठविल्याने गावोगावी शंकरपट उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वरूड तालुक्यात वाठोडा येथे भव्य दिव्य यशवंत शंकरपटाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांना आनंदाची पर्वणी ठरनार आहे.

विदर्भातील शेतकर्‍यांचे मनोबल वाढावे शेतकर्‍यांना आपल्या बैलांसोबत प्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने यशवंत शंकरपट मंडळ व आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारच्या वतीने वरूड तालुक्यातील वाठोडा येथे १७, १८ व १९ मार्च रोजी भव्य यशवंत शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन गट असून ‘अ’ गट, ‘ब’ गट व तालुका गट अशा पद्धतीने विभागणी करून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटात भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

या भव्य शंकरपटाचे उद्घाटन १७ मार्च रोजी सद्गुरू योगीराज महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार देवेंद्र भुयार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुखदेव पानसे, माजी आमदार आशीष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, माजी पंचायत समिती सभापती निलेश मगरदे, सरपंच उपसरपंच व इतर मान्यवर यांच्यासह आदी मंडळी उपस्थित राहणार आहे.शेतकर्‍यांनी शंकरपटासाठी नोदणी करुन घ्यावी. तसेच शंकरपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.