नर्सिंगच्या 200 विद्यार्थीनी देत आहेत रात्रंदिवस रुग्णसेवा

32

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.18मार्च):-गेल्या चार दिवसात जिल्हा रुग्णालयात जुनी पेन्शन मिळावी म्हणून सर्वच सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हा रुग्णालयात रुग्ण येणारी संख्या मोठी असून चार दिवसात ऍडमिट केलेली रुग्ण संख्या 1363 आहे तर ओपीडी मध्ये 3328 रुग्णानी उपचार घेतले.

खउण मध्ये 55 रुग्णनी उपचार घेतले. डिलिव्हरी वार्डत मध्ये 90 महिला यशस्वीरित्या मुलांना जन्म दिला 16 महिलांचे सिजर झाले. शस्त्रक्रिया ही 45 झाल्या. प्रत्येक वाड्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आडमिट आहे त्यांच्यावर रात्र दिवस उच्चार करण्यासाठी नर्सिंगच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रुग्ण सेवा देत आहेत.

या सर्व नर्सिंगच्या मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संतोष शहाणे, डॉक्टर. राम आव्हाड,मुख्यआधी सेविका रमा गिरी , संगीता महानवर, प्राचार्य डॉ. सुवर्णा बेद्रे व त्यांचा स्टाफ सर्व रात्रंदिवस लक्ष ठेवून. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या रुग्ण सेवा मुळेच जिल्ह्यात अत्यावश्यक रुग्ण सेवा रात्रंदिवस सुरू आहे.