पेन्शन बाबत कर्मचाऱ्यांच्या भावना शासन दरबारी पोहोचवणार – आ. जयकुमार गोरे

38

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19मार्च):- 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी या मताशी मी सहमत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या विषयावर सकारात्मक असून कर्मचाऱ्यांच्या भावना निश्चितपणे शासन दरबारी पोहोचवेन असे आ. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी या मागणीसह खाजगीकरण – कंत्राटीकरण बंद करावे, विविध विभागतील रिक्त जागा भराव्यात इत्यादी मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभुमीवर माण तालुका शासकीय – निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे या मताशी मीसुद्धा सहमत आहे मात्र पेन्शन लागू करताना राज्याची आर्थिक स्थितीसुद्धा विचारात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी लगेचच पेन्शन लागू करावी अशी भूमिका न घेता शासनास निर्णय घेण्यास थोडासा वेळ द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे उपस्थित होते.यावेळी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.