दोन गोष्टीपासून सावध रहा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

66

भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते. फक्त इतरांना हरवण्यासाठी ती कधीच नसते. आज भारत देशात आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा शहाण्या सुजान नागरिकांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण आज देशात असे काही होतांना दिसत नाही.मोठ्यामोठ्या शब्दांनी देशातील नागरिकांशी नातं टिकत नसते.अच्छे दिन म्हणणे सोपी असते. घरातील चूल पेटविण्यासाठी तर छोट्या छोट्या वस्तू लागतात. त्या पेटविणाऱ्या भावना समजून घेतल्या तर ते नातं घट्ट होते.पोटभर अन्न खाण्यासाठी ते शिजवायला लागते. आणि ते पोटात गेले कि चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी आरशाची गरज असते.त्यावेळी आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल,पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो.आज देशात आरसा बघण्याची कोणालाच इच्छा दिसत नाही. २०१४ ला दिलाला शब्द “आस” निर्माण करणारा होता. नागरिकांना साथ देवुन “विश्वास” निर्माण करणे आवश्यकता असतांना. तसे कुठे ही होतांना दिसत नाही. आम्ही देशभक्तीचे नारे देऊन देशवाशीयांना फसवले असे बिलकुल कोणाला वाटत नसल्याचे दुख खूप मोठे आहे. म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

जगात भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही.आज देशाच्या नागरिकात हिंमत नसल्यामुळे भीतीचे वातावरण उघड दिसते.

माणसांच आयुष्य फारच छोटसं आहे, आजच आयुष्य हे अशा लोकांसोबत घालवत आहोत. कि ज्यांना आपल्या अस्तित्वाची किंमत शून्य ठरविली आहे. कल्पना करा,तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहे. (२०० स्मार्ट शिटी नाही.) तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे. पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ तुमच्या कडे नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक्य आहे.तुम्ही आसपास पाहता. ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथून कुठलाच ठळक मार्ग दिसत नाही. कुठे मोठे खडक आहेत,कुठे मोठे डोंगर तर कुठे मोठी दरी,तर कुठे महाकाय जंगल व झाडे आहेत आणि कुठे झुळझुळ वाहणारा पाण्याचा झरा आहे.अश्यावेळी मार्ग शोधण्याचा एकमेव उपाय म्हणजे चालणे होय. तो मार्ग शोधत तुम्हाला कायम अवतीभवती पहात जोवर योग्य मार्ग दिसत नाही तोपर्यंत चालत राहावं लागणार आहे. जर थांबलात तर मार्ग कधीच मिळणार नाही. बऱ्याचदा तुम्ही अश्या वाटांवर जाता जिथून तुम्हाला परत येणं भाग पडतं, बरेच पर्याय सुरवातीला योग्य वाटतात पण ते पुढे जाऊन चुकीचे ठरतात. म्हंटलं तर प्रत्येक दिशेला जाऊ शकता तरी एकाच दिशेला जाण्याशिवाय पर्याय नसतो.

अश्या वेळी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग शोधावा लागेल आणि तो एकमेव मार्ग शोधणे म्हणजे काय तर प्रथम अपयशी होणं !. काही भाग्यवान लोकांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात मार्ग लगेच सापडेल. परंतु बहुतांश लोकांसोबत तसे घडत नाही. आपल्याला पहिल्यादा धाडसाने एक दिशा निवडावी लागते,एका मार्गावर जावे लागते,जमेल तसं adjust करावं लागतं, प्रसंगी चार पावलं मागे येऊन पुन्हा पुढे जावं लागतं.एवढं करूनही कधी कधी आपल्याला पाहिजे ते ठिकाण सापडतच नाही,वेगळेच काही हाती लागतं. त्याचाही आनंद घेऊन पुन्हा नव्याने प्रयत्न करावा लागतो.दोन गोष्टी सोडुन मैत्री करा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

आपण आयुष्यात असे अनेक प्रश्न हाताळत असतो. व्यवसाय कोणता करावा? करावा की करू नये ? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आहे ते करिअर बदलावे की नाही.असे अनेक निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी मित्रानो, लक्षात ठेवा की तुम्ही एका जंगलाच्या मधोमध उभे आहात, ज्याचा कोणताही नकाशा नाही. फक्त आपल्याला बेस्ट वाटेल त्या दिशेला एक एक पाऊल टाकत राहणे आणि वेळोवेळी आपला मार्ग, दिशा, वेग adjust करत राहणे हाच एकमेव उपाय आहे. पण तुम्हाला सांगू मित्रानो, जेव्हा आपण अशा वाटा शोधत असतो तेव्हा आपोआप मागे पाऊलखुणा ठेवत जातो. त्याच्याच पुढे पाऊलवाटा होतात. आपण आपला मार्ग स्वतः बनवत जातो. तुमचा मार्ग बेस्ट नसेल, जलद नसेल, सोपा नसेल. पण तो तुमचा स्वतःचा असेल. प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक चुकीच्या वळणावर शिकलेला धडा तुम्हाला पुढे मदत करेल आणि हीच प्रोसेस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल ! आणि शेवटी प्रवासच अंतिम स्थानावर पोहोचण्यापेक्षा जास्त आनंद देऊन जाईल ! या प्रवासासाठी , अनोळखी वाटा शोधण्यासाठी, पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी जो जगतो. तोच खरं जगतो !! यशस्वीपणे वाटचाल पण करतो. अपयशी झाल्यावर ज्यांनी अपमान केला तेच यशस्वी झाल्यावर गुणगौरव करतात. म्हणूनच दोन गोष्टी सोडुन मैत्री करा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

देशावर ज्या पक्षाने साठ वर्ष केंद्रात सत्ताधारी म्हणून राज्य केले त्यांनी देशात अनेक सार्वजनिक उद्योग निर्माण केले. आजचे सत्ताधारी देशाची संपती विकून जनतेला राज्य कसे करावे हे शिकवत आहेत.म्हणून मतदारांनी दोन गोष्टी सोडुन मैत्री करावी “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !! मतदारांना ५६ इंच छाती असणाऱ्या राजाचा अनुभव आला असेल तर ही गोष्ट वाचा,भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला काय हवं ते माग मिळेल!! भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र तर फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण,वचन देण्याआधी विचार कर. जमेल का?.भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,अरे याचका,माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही, माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं.संध्याकाळ झाली तरी ते भरणं सुरूच होतं.राजाचा सगळा खजिना रिता झाला.आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको, म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात टाकली पण ती पण गायब झाली.(कृपया राम मंदिर संकलन निधी चा संबध नाही.) रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,महाराज,माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.(आंदोलनजीवी शेतकरी,पेन्शन मागणारे सेवानिवृत्त कर्मचारी )भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.

सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?. भिक्षुक म्हणाला, ते मलाही माहिती नाही हे भिक्षापात्र माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे. त्यातच माणसाचं मन असतं.आणि ते कधीही व कशानेही भरत नाही असे म्हणतात!! भारताच्या मतदारांना काही गोष्टी आठवत असतील तर पहा हम तो फकीर है झोला उठाये चाल दिये.मै तो चौकीदार हु, मै देशका प्रधानसेवक हु, जो चाये सेवा करुंगा.मै ना खाऊगा और ना किसीको खाने दुंगा.असे जाहीर सभेत सांगणाऱ्यानी देशाची सार्वजनिक संपती कवडीमोलाने विकली.तरी म्हणतात “सब का साथ सबका विकास” आता येणाऱ्या काळात,शेतकरी,शेतमजूर,कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी मतदार म्हणून देशाचा विचार करावा.देश असला तर तुम्ही आम्ही असणार आहोत.आणि देश नसेल तर आपण सर्वच मनुवादी विचारांचे गुलाम असणार आहोत.म्हणूनच भारतीय नागरिक म्हणून दोन गोष्टी पासून सावध असणे आवश्यक आहे.त्या म्हणजे दोन “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२००३८५९