गंगावाडी ग्रामपंचायतने विद्यार्थ्यांसाठी जि.प.शाळेत फिल्टर बसवून केली पिण्याच्या पाण्याची सोय

32

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.20मार्च);-तालुक्यातील तलवाडा गावापासून जवळच असलेल्या गोदाकाठच्या गंगावाडी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी सरपंच भास्कर हातागळे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत शाळेत फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेले हे काम कौतुकास्पद पात्र असून गावातील नागरिक, शिक्षक व विद्यार्थी यांनी गंगावाडीचे सरपंच भास्कर हातागळे, ग्रामसेवक एम.एम.कचरे तसेच ग्रा.प.सदस्यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अत्यावश्यक असलेली जी कामे दुर्लक्षित होती ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य व गावातील नागरिकांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास जावीत यासाठी सरपंच भास्कर हातागळे यांनी पुढाकार घेतला आहे.

ते गावात विकासाची कामे करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून मिळणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विविध विकास कामांबरोबरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून तात्काळ शाळेत फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी सरपंच भास्कर हातागळे, ग्रामसेवक एम.एम.कचरे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले आहेत.