यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे हे शेतक-याच्या बांधावर

36

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21मार्च):-अवकाळी पावसाने व गारपिटने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.म्हणून यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्यातील प्रामूख्याने अमनपुर, चुरमुरा,कुपटी,नागापुर गाजेगाव आकोली इत्यादी गावांना भेट देऊन येथील शेती चे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तेथील नुकसान ग्रस्त भागाची पाहाणी केली आहे.

यावेळी आजूबाजूच्या गावातील अमनपुर येथून अशोक वानखेडे, चुरमुरा, मोतीराम जाधव, सुधाकर जाधव, खामराव मोरे कुपटी, पवन देशमुख, नागापुर पोलीस पाटील नागापुर यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उमरखेड तहसीलदार डॉ आनंद देउळगांवकर मंडळ, अधिकारी, तलाठी व प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.नुकसान ग्रस्त शेतक-यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार अशी आशा लागली आहे.