मांडवा येथे जनजागृती लोककला पथनाट्ये कार्यक्रम संपन्न

34

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30मार्च):-माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यवतमाळ जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाव्दारा शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी शेतकरी, गावकरी, महीला वर्ग, युवक, युवती यांच्या करिता ज्या काही महाराष्ट्र शासन विकिस योजना आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने जिल्हा माहिती अधिकार मनिषा सावळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद तालुक्यातील मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दि.२९ मार्च २०२३ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था नेताजी नगर यवतमाळ या संस्थेच्या लोककला संचाने आपल्या विषेश शैलीतुन जनतेला लोकगीते व लोकनाट्य मधुन प्रबोधन, प्रभावी पणे योजनांची योग्य मार्गदर्शन व माहिती दिली.तसेच व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पण योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अल्का ढोले ह्या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण,शाळा सुधार समिती अध्यक्ष विनोद आडे हे उपस्थित होते.संच प्रमुख गजानन वानखडे, गजानन जडेकर, किशोर घोंगडे, दिपक डोंगरे, उषा गजानन वानखडे, गिता गणेश मेश्राम, रोहित वानखडे, प्रशांत खोरगडे, दिपक राठोड, जनार्दन राठोड ईत्यादी कलावंतांनी उत्कृष्ट कलापथक सादरीकरण केले.

या कार्यक्रमाला धर्मा राठोड, नागु टेकाळे, मारोती गजभार,प्रकाश ढोले, प्रकाश राठोड, हरिभाऊ धाड,रमेश ढोले, कैलास राठोड, ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते, गजानन आबाळे, ग्रा. पं. सदस्य गोपाल मंदाडे, कमल राठोड, शालिनी धाड,कविता आडे,संगिता गजभार, जयश्री आबाळे, आरती पुलाते, ग्रा.पं.कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव,यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी,महिला बचत गटांच्या महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.