✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.20जुलै):-महाराष्ट्र समविचारी मंचच्या अधिपत्याखालील महाराष्ट्रव्यापी बेरोजगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर संदीप सुधाकर वासाडे (MBA) यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
समविचारी बेरोजगार संघटना ही राज्य स्तरावर एकमेव संघटना आहे.असंख्य बेरोजगार एकत्रित करुन आपले अधिकार न्याय आणि विविध मागण्यांसाठी कार्यरत आहे.शासकीय निमशासकीय नोकरभरतीसाठी ही संघटना पाठपुरावा करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी संदीप सुधाकर वासाडे (MBA) यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा प्रांताध्यक्ष बाबा ढोल्ये यांनी नुकतीच केली आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देतांना जिल्हाध्यक्ष संदीप सुधाकर वासाडे (MBA) यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना ही संघटना उत्तम व्यासपीठ निर्माण करुन देवून अन्याय विरोधात सनदशील मार्गाने न्याय मिळवून देईल असे सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल समविचारी कोअर कमिटीचे बापू कुलकर्णी,श्रीनिवास दळवी,निलेश आखाडे,अनुप हल्याळकर,यांनी अभिनंदन केले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED