कवी सतीश लोंढे यांना श्रद्धांजली अर्पण

29

✒️बल्लारपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बल्लारपूर(दि.2एप्रिल):-कवी सतीश लोंढे बल्लारपूर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले आणि त्यांचेवर दि. १/४/२०२३ रोजी मोक्षधाम बल्लारपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले .

व्यवसायाने ते राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत होते. त्यासोबतच ते सामाजिक, साहित्य मंडळ आणि सांस्कृतिक कार्याशी जुळलेले होते.ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य होते . प्रासंगिक काव्यरचना, लेखन कार्य ते करीत असत. झाडीबोली साहित्य मंडळ बल्लारपूर शाखा तसेच नक्षत्रांचे देणं काव्यमंच पूणे चे आजीव सदस्य होते.

दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या आयोजनात ते सहकार्य करीत असे. या संमेलनात त्यांनी आपल्या आई- वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार सुरू केले होते. धनगर समाजाचे संघटन कार्यात ते नेहमी पुढाकार घेत असे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक संस्थांनी त्यांची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सामाजिक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.बल्लारपूर येथे मोक्षधाम स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, एड. राजेंद्र जेनेकर ,कैलास उराडे, विनायक साळवे,प्रा. रवी साळवे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.