धनादेश अनावर प्रकरणात निर्दोष मुक्तता

35

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3एप्रिल):-येथे मा.फोजदारी न्यायदीश प्रथम वर्ग न्यायालय गंगाखेड येथे फिर्यादी सुभाष आश्रोबा शिंदे राहणार गंगाखेड यांनी इम्रान खान हबीब खान पठाण राहणार गंगाखेड यांच्या विरोधात 1,80,000/-रुपयाचा चेक नवटल्या प्रकरणी सन 2015मध्ये आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती फिर्यादी प्रमाणे आरोपीला व्यवसायिक व घरगुती अडचण असल्याने हात उसनी रक्कम दिली होती.असे कथन केले होते आरोपी व फिर्यादी यांच्या मध्ये काही व्यवहार झाला नव्हता त्या मुळे तो आरोपी देणे लागत नव्हता फिर्यादी यांनी तो चेक सावकारी व्यवहार पोटी वापरला सावकारी व्यवहार संपल्या नंतर त्यांनी आरोपीस चेक परत दिला नाही त्या चेक चा गैर वापर करून कोर्टात फिर्याद दाखल केली असे कथन इम्रान खान यांच्या वतीने करण्यात आले. तसेच सुभाष शिंदे यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक परभणी यांच्या कडे अवैध्य सावकाराची तक्रार इम्रान खान यांनी दाखल केली होती त्यात जिल्हा उपनिबंधक परभणी यांनी अवैध्य सावकारी करत असल्या बाबत निर्णय दिला त्या नंतर सुभाष शिंदे यांच्यावर गंगाखेड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अशा प्रकारे कागदपत्रे पुरावे इम्रान खान यांच्या वतीने वकिलाने सादर केले.सदर प्रकरणी फिर्यादी सुभाष शिंदे व आरोपी इम्रान खान यांच्यात हात उसने रक्कमेचा कसलाही व्यवहार झाल्याचे फिर्यादीला सिद्ध करता आले नाही फिर्यादी व त्यांच्या तर्फे साक्ष नोंदवण्यात आली सादर साक्ष व दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्या नंतर दिनांक 31/03/2023 रोजी विद्यमान फोजदारी न्यायदीश प्रथम वर्ग गंगाखेड मा.न्यायधीश रुद्रभाटे साहेब यांनी आरोपीची सादर गुन्हात निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ऑड.कुलदीप टेंगसे यांनी काम पहिले व त्यांना ऑड.एच.एस. पठाण यांनी सहकार्य केले.