ऐतवडेखुर्दच्याआदर्श बालक मंदिर मध्ये डाॅ. प्रज्ञा पाटील यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

32

✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

इस्लामपूर(दि.4एप्रिल):-विद्यार्थी हा गुणवत्तेच्या जोरावर आपला ठसा उमटवीत असतात असे मत जयदत्त ज्ञान प्रबोधनीच्या संचालिका डॉ प्रज्ञा पाटील यांनी आदर्श बालक मंदिर यांच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त केले.श्री वारणा शिक्षण संस्था संचलित आदर्श बालक मंदिर ऐतवडे खुर्द येथील नुकताच ITSE चा निकाल 2022-23 हा जाहीर करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ प्रज्ञा पाटील होत्या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा मुळातच हुशार असतो पण त्याला योग्य ती दिशा देणे हे तितकेच महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदैव आदर्श बालक मंदिर हे काम करत असते असे गौरवउदगारही त्यांनी यावेळी काढले.

नुकत्याच घेण्यात आलेल्या आय टी एस इ परीक्षेमध्ये यशस्वी व गुणवंत झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे इयत्ता पहिली 1) सई अनिकेत गायकवाड जिल्ह्यात तृतीय 2) नील दादासो जाधव जिल्ह्यात चतुर्थ *इयत्ता दुसरी–* 1) मधुरा दिलीप पाटील जिल्ह्यात द्वितीय 2) निलेश महेश माने जिल्ह्यात चतुर्थ 3) राजनंदिनी संदीप जाधव जिल्ह्यात चतुर्थ4) स्वरांजली संतोष चांदणे जिल्ह्यात पाचवी 5) आरोही सुधीर चव्हाण जिल्ह्यात पाचवी *इयत्ता तिसरी—* 6/1)श्रद्धा सुनील जाधव जिल्ह्यात दुसरी *इयत्ता चौथी–* 1) आदिती कुमार सूर्यवंशी जिल्ह्यात पहिली 2) राजनंदन विनोद गुरव जिल्ह्यात पाचवा केंद्रस्तरावरील क्रमांक खालील प्रमाणे , *इयत्ता पहिली—*1) श्रीवर्धन भालचंद्र पाटील केंद्रात प्रथम 2) आराध्या राणा प्रताप मोरे केंद्रात द्वितीय3) श्री राज आनंदा सूर्यवंशी केंद्रात द्वितीय 4) तनिष्का प्रवीण महाडिक केंद्रात तृतीय5) आदिती दिलीप कदम केंद्रात तृतीय *इयत्ता दुसरी–* 1) प्रार्थना प्रवीण पवार केंद्रात प्रथम 2) आदिती अमोल पाटील केंद्रात प्रथम 3)स्वरांजली जयदीप पवार केंद्रात द्वितीय4) एलिना जॉर्ज बोरडे केंद्रात द्वितीय,स्वरांजली शशिकांत पाटील केंद्रात तृतीय *इयत्ता तिसरी-* 1)आरोही पंडित पाटील केंद्रात प्रथम 2)शुभम कृष्णात महिंद केंद्रात द्वितीय 3)श्रावणी मधुकर सुतार केंद्रात तृतीय

*इयत्ता चौथी–* 1) सिद्धेश प्रशांत बुढे केंद्रात प्रथम 2) उत्कर्ष प्रदीप देवकर केंद्रात द्वितीय 3) आराध्या सागर जाधव केंद्रात तृतीय या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन डॉ प्रताप पाटील यांनी केले तर प्रोत्साहन डॉ प्रज्ञा पाटील यांनी दिले या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श बालक मंदिर ऐतवडे खुर्द च्या मुख्याध्यापिका सौ एम एम करणे सौ काळे सौ भोसले सौ रणभिसे सौ पाटील सौ अपर्णा पाटील आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले