राज्यात पत्रकारांवर सातत्याने होणार्‍या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार – : संतोष निकम

44

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4एप्रिल):-राज्यात पत्रकारांवर सातत्याने होणारे भ्याड हल्ले ही चिंताजनक बाब असून राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्यावतीने याबाबत राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिली. ते नागपूर येथील हॉटेल रॉयल हेरिटेज मध्ये आयोजित राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ विदर्भ प्रदेश अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. स्थानिक वाळू माफिया, अवैध गौण खनिज माफिया, अवैध व्यावसायिक, भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गावगुंडांकडून निर्भीडपणे पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांवर भ्याड हल्ले केले जातात ही गंभीर बाब असून यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता धोक्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे संतोष निकम यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीवेंस काैन्सिलचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा, पत्रकार संघ राष्ट्रीय सचिव रमेश देसाई, प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील, प्रसिद्ध सिनेकलावंत राजेश चिटणीस, प्रज्वल भोयर, पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्ल मेश्राम, प्रदेश सहसंघटक पद्माकर घायवान, सुरेश पंधरे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मडावी, प्रीतम नगराळे उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता विदर्भ स्थरीय पुरस्कार माय खबर २४ डिजिटल मीडिया आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म चे संचालक प्रीतम मडावी, कृष्णा शेंडे व राजेश खोब्रागडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते देण्यात आला .

यावेळी विदर्भातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी तर आभार गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋतिक अलाम, भूपेंद्र शेंडे, स्वप्नील मडावी, जितेंद्र शेंडे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश भालेराव, सचिव सूरज भिलकर,प्रसिद्धी प्रमुख भूषण निकम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश खोब्रागडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष डोमाळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रशीद शेख, वाशीम जिल्हाध्यक्ष अर्जुन डोंगरदिवे, अमरावती जिल्हाध्यक्ष सुबोध मोहोड, अकोला जिल्हाध्यक्ष राजेश गोसावी, यासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासह विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.