गेवराई बायपासवर चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

28

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.5एप्रिल):-भरधाव वेगातील चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना गेवराई बायपासवर (दि,4 एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुल मुळे (रा. अंबड जि. जालना) असे या तरुणाचे नाव आहे. सध्या गेवराई येथे राहत असलेला हा तरुण मंगळवारी (दि. ४) पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.11 ए.जे. 3932) जात होते. गेवराई बायपासवरील एचपी पंपासमोर रस्ता क्रॉस करत असताना समोरून भरधाव वेगाने बीडकडे जाणाऱ्या चारचाकीने धडक दिली.

यामध्ये राहुल हा गंभीर जखमी झाला. दोन्ही गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंगचे सुपरवायझर प्रतीक कदम, अंबादास जाधव, सुनील कवडे, विशाल डोंगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.