पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालास्तरावर जात प्रमाणपत्र वितरित होणार

47

🔸पुरोगामी शिक्षक संघटनेचा संवर्ग विकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठपुरावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8एप्रिल);- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे समता ,स्वातंत्र्य ,न्याय , बंधुता यातुन समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा संदेश दिला आहे . राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील दुर्बल वंचिताबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणे व गांभीर्याने नमूद केले आहे . त्याअनुषंगाने राज्यातील अनुसूचित जाती वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येतात . या सर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी म्हणून १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व राबविण्यात येणार आहे . त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करणे व इतर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे .

त्याअनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत सर्व शाळांना संवर्ग विकास अधिकारी यांच्या स्तरावरून सूचना निर्गमित करण्यासाठी शासनाने पत्र काढून सूचित केले आहे .जेणेकरून शाळास्तरावर शिबिराचे आयोजन करून संबंधित पाल्यांच्या पालकांना याबाबत माहिती देऊन कागदपत्रे गोळा करून जात प्रमाणपत्र निर्गमित करणे सोयीचे होईल . या संदर्भाने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष रामचंद्र नागपुरे , सरचिटणीस संदिप चौधरी , कार्याध्यक्ष उमेश आखाडे , कार्यालयीन सचिव प्रदीप ढोके, सहकोषाध्यक्ष प्रमोद तुराणकर , महिला मंचच्या अध्यक्षा छाया आडे , सरचिटणीस स्वाती खराबे , स्नेहल खिरटकर , श्वेता लांडे व दिप्ती चौखे यांनी संवर्ग विकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला असता यासंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही करून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासीत केले .