चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमुठ भक्कम!

35

🔸भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमूर(दि.26एप्रिल):- कृषी उत्पन्न बाजार समितीची चिमुरच्या संचालक मंडळाची निवडणुक दिनांक २८ एप्रील रोजी होवु घातली असुन भाजप प्रणित शेतकरी सहकारी विकास आघाडी व कांग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (उध्दव ठाकरे) व मित्र पक्ष समर्पित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होत असुन महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेत एकतेची वज्रमुठ भक्कम असल्याचे चित्र उभे केले आहे.

भाजप प्रणित शेतकरी सहकार विकास आघाडीने भाजपच्या जुन्या व जाणत्या व्यक्तींना उमेदवारी नाकारून कॉंग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नवख्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्यातील जेष्ठ व युवक कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजीचा सुर स्पष्ट दिसत आहे. भाजपाचे जेष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव असलेले तथा पंचायत समितीचे माजी सदस्य पुंडलिकराव मत्ते यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये सामिल झाले. मत्ते यांच्या भुमिकेमुळे भाजपात पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त होतांना दिसत असून महाविकास आघाडीत अनुभवी व्यक्ती सहभागी झाल्याचे समाधान व्यक्त होतांना दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सेवा सहकारी मतदार संघ (सर्व साधारण गट) रामदास चौधरी, कृष्णा तपासे, चंद्रशेखर दडमल, शंकर नरड, पुंडलिक मत्ते, विवेक रामटेके, सेवा सहकारी संघ (महिला गट) मिना तराळे, सुरेखा शेबेंकर, अडते व व्यापारी गटात राजु कावळे, संतोष बंडे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात विजेंद्र घरत, मोरेश्वर डुमरे, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक ग्रामपंचायत गटात तुलाराम बारसागडे, अनुसुचित जाती जमाती ग्रामपंचायत गटात लोकनाथ रामटेके, विमुक्त जाती व भटक्या जमाती सेवा सहकारी गटात दुर्योधन तांबरभोगे व हमाल व मापारी गटात भरत बंडे हे उमेदवार ताकदीने निवडणुक लढवित आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याकरीता काँग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, धनराज मुंगले, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, प्रशांत कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु मुरकुटे व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे जेष्ठ व युवा कार्यकर्ते जिवाचे रान करीत असुन आपल्या एकीचे प्रदर्शन करतांना दिसत आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना यांचे व्यक्तीरिक्त अन्य बहुजन विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते अत्यंत जोमाने महाविकास आघाडीच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. चिमुर तालुक्यात भाजपमध्ये उघडपणे दिसत नसले तरी आमदार भांगडीया व कॅबीनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार असे गट कार्यरत आहेत. यातील मुनगंटीवार गट हा महाविकास आघाडीला पडद्याचे आडुन सहकार्य करीत असल्याचे बोलल्या जात आहे. दलित, ओबीसी, मुस्लीम कार्यकर्ते भाजप प्रणित पॅनलचा पराजय कसा होईल या दृष्टीने व्युहरचना आखतांना दिसत आहेत. भाजपसोबत प्रचारात राहुन महाविकास आघाडी भक्कम कशी होईल याकरीता काही कार्यकर्ते काम करीत असल्याची चर्चा आहे.

भाजपा प्रणित शेतकरी सहकार आघाडीतील अंतर्गत वादाच्या चर्चा सर्वसाधारण जनता करित असुन यावेळी प्रस्थापित सहकार नेत्यांच्या नाकात दम आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. भाजपात नवख्यांना संधी दिल्यामुळे जुने-जानते भाजप नेते व कार्यकते हिसाब चुकता करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. एकुणच महाविकास आघाडीच्या एकीमुळे या निवडणुकीचे संदर्भ आणि भविष्यातील वाटचाल बदलुन टाकण्याचे चित्र सध्यास्थितीत स्पष्ट दिसत आहे.