राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्थेच्या अफरातफर प्रकरणी खातेदारासह कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषनाला शिवसेची साथ!

28

🔸नीलमताई गोऱ्हे व अंबादास दानवे यांना दिले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4मे):-राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे ७ कोटी६६ लाख ९० हजार ५१० रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण एक वर्षापूर्वी उघडकिस आले. त्यानंतर या प्रकरणात चिमूर पोलीस स्टेशन मध्ये सहा महिन्यापूर्वी गुन्हे नोंदवून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात येत्या आठ दिवसांत आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवार २६ एप्रिल पासून संस्थेच्या अध्यक्षासह कर्मचारी खातेदारानी चिमूर तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने पाठिंबा दिला असून उपविभागीय अधिकारी मार्फत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनानिवेदन देण्यात आले.

चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे अफरातफर झाल्याची तक्रार चिमूर पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०२१ रोजी संचालकांनी केली. त्यानंतर अंकेक्षन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३० सप्टेंबर २०२२ ला संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर प्रकरण जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले, या सर्व प्रकारात ठेवीदारांची जमा रक्कममिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधित आरोपीवर कारवाई करून जमा असलेली वसूल करून मिळेल या आशेवर ठेवीदार व खातेदार आहेत. संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना ठेवीदार खातेदाराकडून जमा रकमेकरीता सतत तगादा लावण्यात येत आहे.

या संदर्भाने कर्मचारी व ठेवीदार यांनी साखळी उपोषण सुरू केले असून उपोषणाचे मंडपाला शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात उपोषणाला पाठिंबा दिला असून.या वेळी उपविभागीय अधिकारी मार्फत विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे याना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, तानाजी सहारे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, केवलसिंग जुनी, नितीन लोणारे, संजय वाकडे, समीर बल्की, सुनील हिंगनकर, रोहन नन्नावरे. कृष्णकुमार टाँगे उपस्थित होते.