आयुष्यातील अविस्मरणीय क्षण (पदवीचे तीन वर्ष) Unforgettable Moments of Life (Three Years of Degree)

31

मित्रांनो, बारावी झाल्यानंतर मी पदवीच्या शिक्षणाकरिता होलसेल नाईक महाविद्यालय पुसद येथे 2021 मध्ये कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा कोरोना महामारीचा काळ सुरू होता. शाळा आणि महाविद्यालय ऑनलाइन स्वरूपामध्ये सक्रिय होते. व यामध्येच महाविद्यालयीन प्रवास सुरू झाला, प्रथम वर्षाला असताना ऑनलाइन क्लास व्हायचे व विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या अपडेट्स देण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. व यातूनच काही विद्यार्थ्यांची संपर्क येत गेला व व्हाट्सअप द्वारे बोलणे सुरू झाले तेव्हा मनात विचाराला काय यार आपण किती अनलकी आहोत कारण आपल्याला कोरोना महामारीच्या काळामुळे महाविद्यालयीन जीवनाचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्यामुळे ही मनात खंत होती कारण कॉलेज म्हटल्यानंतर मित्र-मैत्रिणी, गप्पागोष्टी, मजाक मस्ती हा सर्व प्रकार असतोस. व अशा ऑनलाइन माध्यमातूनच आमचे प्रथम वर्ष ऑनलाइन परीक्षा देऊनच निघाले. आता या ऑनलाइन परीक्षा मध्ये गंमत कशी व्हायची की जेव्हा परीक्षेचा टाइम टेबल आला होता, तेव्हा निर्बंध काहीशी शिथिल झाले होते आणि त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य झाले व अशातच परीक्षेची वेळ आणि अर्थातच मित्र एकत्र येणारच.

तर आम्ही काही मित्र सुरुवातीला भेटलो परीक्षेच्या निमित्ताने आणि ज्या वेळेस ऑनलाईन परीक्षा सुरू व्हायची आणि लिंक ओपन करायचे तेव्हा ग्रुपमध्ये पेपर सोडवायचं आणि एका जणांकडे मोबाईल असायचा आणि बाकी सर्व नोट्स मध्ये उत्तरे शोधण्यामध्ये मग्न व्हायचे. परीक्षेचा पॅटर्न हा एमसीक्यू पद्धतीने असल्यामुळे नोट्स मध्ये उत्तरे सापडणे सहज शक्य झाले होते आणि गमतीजमतीने पेपर हा व्यवस्थित जायचा साधारणता एक तासाचा वेळ असायचा परंतु वीस मिनिटांमध्येच पेपर सोडवून आम्ही सर्व सबमिट करायचं आणि मग मित्रांसोबत गप्पा मारत बसायचं. अशाप्रकारे आम्ही प्रथम वर्ष पास केले आणि द्वितीय वर्षाला प्रवेश मिळविला. मग निर्बंध हटवल्यामुळे पूर्वीसारखीच शाळा कॉलेज सुरू झाले. व आम्ही काही मोजके विद्यार्थी कॉलेजला यायला लागलो. रोजचा ये जा असा प्रवास सुरू झाला आणि यातच मैत्री ही वाढत गेली.

मग काही ठराविक विद्यार्थी हे जीवाभावाचे मित्र झाले. आणि मग दिनक्रम सुरू झाला शुक्रवार सोडून बाकी सर्व दिवस कॉलेजला यायला लागलो. क्लास करणे, कॅन्टीनला जाणे असा आमचा रोजचाच फंडा असायचा. आणि पदवीचे दुसरे वर्ष ही निघून गेले. आणि मग पदवीच्या अंतिम वर्षात प्रवेश मिळविला. मित्रांच्या सहवासात राहण्याचं हे आमचं अंतिम वर्ष होता आणि म्हणूनच आम्ही रोज कॉलेजला यायला लागलो तरी पण काही मोजकेच विद्यार्थी कॉलेजला यायचे पण असो महाविद्यालयीन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जूनियर विद्यार्थ्याशी सुद्धा संपर्क वाढला. आणि मैत्रीचे एक घट्ट नाते तयार झाले आणि पाहता पाहता पदवीच्या तिसऱ्या वर्षातील पाचवे सत्र सुद्धा संपले. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच सहाव्या सत्रात आम्ही येऊन पोहोचलो. पण मैत्रीच्या सहवासातले हे दिवस फार कमी वेळामध्येच निघून गेले.

महाविद्यालयीन जीवनातली मैत्री ही कधीही विसरता येत नाही कारण यामध्ये आपण मित्रांना दिलेल्या वेळ त्यांच्यासोबत शेअर केलेल्या गोष्टी व शिक्षक मंडळींचा केलेला आदर हे सर्वच आठवणीत असतातच आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात माझ्या बाबतीत तर हे फारच अविस्मरणीय क्षण आहेत कारण महाविद्यालयीन जीवन कसा असतं हे अनुभवल्यानंतर जो काही अनुभव आला तो अतिशय आनंदमय आणि अविस्मरणीयच. मला हे दिवस आयुष्यभर स्मरणात राहतील आणि जे काही मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले ते नेहमी तसेच राहतील.

✒️लेखक:-स्वप्निल गोरे,सावरगाव(गोरे)ता. पुसद,जिल्हा यवतमाळ,मो. नं.8767308689