नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या रडारवर वाळू व गौण खनिज माफिया

33

✒️प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11मे):- नाशिक जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिकच्या इतिहासात मोठी कामगिरी केल्यानंतर आता त्यांच्या रडारवर वाळू माफिया व गौण खनिज माफिया असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद होण्या बाबत सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात धाडसत्र सुरू झाले. आज या तालुक्यात तर उद्या त्या तालुक्यात कधी स्थानिक पातळीवर तर कधी मुख्यालयातून कारवाई करण्यात येत होत्या. बघताबघता संपूर्ण जिल्ह्य़ात अधीक्षकांनी वचक निर्माण केला.

साहेबांची वक्र दृष्टी बघितल्याने अवैध धंदे करणार्‍या माफियांना आपले धंदे नाइलाजास्तव बंद करावे लागले. जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी जेरीस आणून सोडले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला तर दुसरीकडे अवैध धंदे बंद करून पोलीस अधीक्षक उमाप यांनी जिल्ह्यात दरारा निर्माण केला त्यामुळे नाशिक जिल्हा चांगला चर्चेत आला आहे. आता जिल्ह्यात अवैध वाळू माफिया व अवैध गौण खनिज माफिया हे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या रडारवर असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.