मुळासकट झाड पाडताना शेतकऱ्यांचा दबून मृत्यू

30

🔺ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील  गोंडमोहाळी बंपर झोनमधील घटना

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14मे):- स्वतःच्या शेतात मधामधे येण्याचे वाळलेले झाड मुळासकट काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त वनमजुराचा झाडाखाली दाबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गोंडमोहाळी शेतशिवारात घडली. मनोहर गुळधे असे मृतक सेवानिवृत्त वनमजुराचे नाव आहे.

चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील रहिवासी सेवानिवृत्त वनमजूर मनोहर गुळधे यांना गोंडमोहाडी शेत शिवारात वन विभागाकडून वनहक्क दाव्याअंतर्गत अडीच एकराचा वन जमिनीचा पट्टा मिळालेला आहे.

त्याच शेतात आज शनिवारी मनोहर गुळधे घरी सरपणाकरिता लाकडे आणण्याकरिता स्वतःचे शेतात गेले होते. शेतातच मोठमोठे झाडे असल्याने त्या झाडांना पाडून त्यापासून तयार होणारा सरपण ते घरी आणत होते. शेतात गेल्यानंतर आज एका मोठ्या झाडाला न तोडता पाड ण्यासाठी त्यांनी त्या सभोवती खड्डा केला. त्यानंतर त्या झाडाला पाडून ते सरपण घरी आणणार होते. सायंकाळीं पाच वाजताचे सुमारास झाड पाडत असतानाच त्यांच्या अंगावर झाड कोसळले आणि ते त्यामध्ये दबल्या गेले.

त्यांचा यामधे जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कुटुंबीयांना होतात शोककळा पसरली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. या दुर्दैवी मृत्यूने घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. दोन महण्यापुर्वी त्यांचा शिक्षक असलेला मोठा मुलगा अपघातात मृत्यू झाला होता या धक्क्यातून न सावरता दुसरा धक्का बसल्याने गुधळे परीवारावर मोठा आघात झालेला आहे.